Posts

Showing posts from March, 2020

मदतीचा हात !

Image
*गुड ईव्हीनिंग सिटी Editorial*👇 *मदतीचा हात!*🤝 _स्वतंत्र भारताच्या इतिहासातच नव्हे तर आजवरच्या इतिहासात उद्भवली नाही, अशी भीषण परिस्थिती सध्या देशात निर्माण झाली आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश तब्बल 21 दिवसांसाठी एकांतवासात गेला आहे. अशा कठीण प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने दिलेला मदतीचा हात स्वागतार्ह म्हटला पाहिजे. करोना विरोधातील लढाईसाठी एक लाख ७० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून सरकारने देशातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्याच सोबत रिझर्व बँकेनेही  रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपात घोषित करतानाच बँकांना पुढचे तीन महिने कर्जाची वसुली स्थगित करण्याचाही सल्ला दिला. त्यामुळे, उत्पन्‍नाची दारे बंद झालेल्या नागरिकांसाठी ही सवलत उपयुक्त ठरेल. लॉकडाऊन मुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी एकीकडे सरकारने कंबर कसली असताना दुसरीकडे उद्योगपती, सिनेस्टार आणि प्रतिष्ठित नागरिकांकडूनही  आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला आहे. संचार बंदीच्या काळात निराधार, बेसहारा नागर

देऊ धैर्याने लढा !

Image
देऊ धैर्याने लढा ! मानवाच्या केसांपेक्षा एक हजार पटींनी लहान असणाऱ्या करोना नामक विषाणूमुळे सध्या आपल्याला घरात बसण्याची वेळ आली आहे. जिकडे तिकडे सगळीकडे या विषाणूचा कहर वाढत चाललाय. आपल्या देशातील स्थिती सध्या नियंत्रणात असली तरी, रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच, चीन, इटली, अमेरिका, स्पेन आदी देशात कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेली स्थिती, तेथील अवस्था, चित्रफिती, मृतांची संख्या याविषयी वेगवेगळ्या स्वरूपाची खरी-खोटी माहिती समाज माध्यमांतून आपल्यापर्यंत पोहोचू लागल्याने कोरोनाविषयी एकप्रकारची जबरी दहशत उत्पन्न झाली आहे.. जगातील भयान परिस्थिती जाणल्यावर कोरोनाचा हल्ला शरीरावर होण्याआधी मनावर आणि आत्मविश्वासावरही होत आहे; मन...काळीज...सगळं सगळं कसं सुन्नं सुन्नं झालं आहे. निश्चितच, संकट मोठं आहे.. परिस्थिती देखील गंभीर आहे. मात्र, ही वेळ नुसती काळजी करण्याची नाही, तर खबरदारी घेण्याची आहे..भीती बाळगण्याची नाही, तर संकटावर स्वार होण्याची आहे. त्यामुळे, आपण कायम आशावादी असायला हवं! निराशावाद आणि नकारात्मक विचारांनी  कुठलीच लढाई जिंकता येत नाही, हा इतिहास आहे. आशावाद

संकटांची मालिका!

Image
संकटांची मालिका! व्यथा-वेदनांचे वर्णन करण्यासाठी शब्दकोशातील शब्दही अपुरे पडावेत, इतक्या भीषण संकटाचे भोग सध्या जनमानसाच्या वाट्याला आले आहेत. एकीकडे कोरोना संसर्गाचा कहर आणि दुसरीकडे अवकाळी पावसाचा धुमाकूळ, आशा दुहेरी संकटाच्या मालिकेत राज्यतील जनता सापडली आहे. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे राज्यातील, जिल्ह्यातील उद्योग - व्यवसाय आधीच अडचणीत सापडले असतांना आता मुख्य व्यवसाय असलेल्या शेतीलाही निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला. ऐन काढणीच्या मोसमात  वादळवार्‍यासह आलेल्या अवकाळी पावसाने  झोडपून काढल्याने उभी पिके अक्षरशः मातीमोल झाली. सोंगणी करुन ठेवलेल्या गहू-हरबऱ्यात पाणी घुसले. हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेत असताना उघड्या डोळ्यांनी पाहण्यावाचून दुसरा पर्याय शेतकऱ्यांजवळ उरला नाही. याआधी खरिपाचा शेतीमाल अतिवृष्टीमुळे खराब झाला होता..ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने हैदोस घातल्याने संपूर्ण खरीप वाया गेले. मका, बाजरी, सोयाबीन शेतातच सडून गेली.. उत्पादनखर्चही निघाला नाही. खरीप हातातून गेल्यावर  किमान रब्बीचे

कसोटी: सरकारची आणि जनतेची!

Image
कसोटी: सरकारची आणि जनतेची! अतिवेगाने पसरणारी कोरोना-साथ आटोक्‍यात आणण्यासाठी राज्यासोबतच आता केंद्र सरकारनेही कंबर कसली आहे. काल रात्री  देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले. कोरोनाशी लढताना 'सोशल डिस्टंसिंग' हा एकमेव पर्याय असल्याचे सांगत पंतप्रधानांनी देशातील नागरिकांना घरात राहण्याचे आहवान केले. करोना चाचणीसाठी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणाही त्यांनी केली. तत्पूर्वी दुपारी  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँक खाती, आयकर, जीएसटी, सीमाशुल्क संदर्भातल्या परताव्यांसाठी विविध सवलती जाहीर करत कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. विद्यमान परिस्थितीत केंद्र सरकारने घेतलेले निर्णय स्वागतार्हचं म्हणावे लागतील. पण ते पुरेसे आहेत का? याचाही विचार यानिमित्ताने करावा लागेल. संसर्गामुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 हजार कोटींची तरतूद करण्याची घोषणा केली आहे. मात्र त्यात आरोग्य सेवा कशा उभारल्या जाणार आहेत, विलगीकरण कक्ष कसे आणि क

आता तरी सावध व्हा!

Image
_*"कोरोना संसर्गाचे आव्हान अभूतपूर्व आहे, हे आपल्याला समाज म्हणून समजलेच पाहिजे.आणि तसे आपण सर्वांनी वागण्यातून दाखवून द्यायला हवे.. 'काही होत नाही..' हा उर्मट विचार आता सोडून द्यायला हवा. जर आपण आपली, कुटुंबाची, समाजाची काळजी यावेळी घेतली नाही तर पुन्हा आपल्याला संधी मिळेलचं, याची शाश्वती देता येत नाही. म्हणूनच, परिस्थितीचे गांभीर्य ओळखा.. सावध व्हा.. दक्ष राहा.. खबरदारी घ्या! इतकीच कळकळीची विनंती आम्ही करत आहोत..!"*_🙏 *आता तरी सावध व्हा!*_👇   _कोरोना विषाणू संसर्गाने जगभरात भीषण हाहाकार माजविला आहे. सद्यस्थितीत भारतात कोरोना संसर्गाचा आकडा फारसा मोठा नसला तरी दिवसेंदिवस त्यात झपाट्याने वाढ होत असल्याने येणाऱ्या काळात हा आकडा गुणाकाराने वाढण्याची भीती व्यक्त केल्या जातेय. हा धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सरकार नागरिकांना घरात राहण्याचा इशारा वारंवार देत आहे.. या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययांशिवाय दुसरं कुठलंही साधन उपलब्ध नसल्याचा जागर आरोग्य आणि सरकारी यंत्रणा पोटतिडकीने करत आहेत. मात्र तरीही काहींना परिस्थितीचं गांभीर्य अद्याप समजलेल

सामूहिक दायत्वाची गरज!

Image
सामूहिक दायत्वाची गरज! कोरोना विषाणुचे महासंकट देशावर कोसळले असून सर्वाधिक संसर्ग झालेले रूग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत..करोना विषाणूविरोधातले हे एक प्रकारचे युद्धच असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या संकटाचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे. त्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजनाही केल्या जात आहेत. परंतु हे युद्ध फक्त एकट्या सरकारला, सरकारच्या चारदोन यंत्रणांना लढता येणारे नाही. यामध्ये प्रत्येक नागरिकाला सहभागी व्हावे लागेल..लस किंवा औषध उपलब्ध नसलेल्या करोना संसर्गाला थोपवण्यासाठी आज तरी केवळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांचेचं शस्त्र आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे या कसोटीच्या काळात आपण सगळ्यांनी शहाणपणाने, समजुतदारपणे वागण्याची आवश्यकता आहे. सरकार आणि आरोग्य यंत्रणेकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनेचे आपण तंतोतंत पालन केले पाहिजे.  गर्दी टाळणे, अनावश्यक प्रवास टाळणे, स्वच्छता पाळणे यासह काही बंधने लोकांनी आपण होऊन पाळली आणि प्रशासनाने घातलेले निर्बंध गांभीर्याने घेतले तर करोनो हद्दपार करणे सोपे जाईल. आज सरकार, प्रशासन, आरोग्य यंत्रणा पोलिस यंत्रणा  हातावरील घड्याळाच्या वेळा न बघता को

'निर्भया’ला न्याय!

Image
मानवी क्रौर्याची परिसमा ओलांडणाऱ्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना आज सूर्योदयापूर्वीच फासावर लटकवण्यात आले. 16 डिसेंबर 2012 च्या रात्री दिल्लीत 23 वर्षीय निर्भयावर सहा नराधमांनी सामूहिक अत्याचार केला होता. त्यातील  एकाने तुरुंगात असतानाच आत्महत्या केली होती, तर एकाला अल्पवयीन म्हणून फाशीतून सुटका मिळाली. उरलेले मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा, विनयकुमार सिंह.. यांना आज सकाळी साडेपाच वाजता तिहार तुरुंगात सुळावर लटकविण्यात आले.कायद्यातील  कमकुवत तरतुदींना समोर ठेवून  मृत्युदंडाची शिक्षा टाळण्यासाठी आरोपींनी आपल्या वकिलांमार्फत शर्थीचे प्रयत्न केले. तीन वेळा त्यांची फाशी पुढे ढकलण्यात आली; यावेळी तर दोषींच्या वकिलांनी थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र अखेर उशिरा का होईना न्याय झाला, आणि चार नराधमांना त्यांच्या कुकर्माची शिक्षा मिळाली. पण, हा न्याय मिळण्यासाठी तब्बल 7 वर्षे, 3 महीने आणि 4 दिवसांचा वेळ जावा लागला, ही शोकांतिकाच म्हटली पाहिजे. न्यायास विलंब म्हणजे न्यायास नकार, हे खरं तर न्यायपालिकेचेच तत्व. पण आपल्या देशात  न

कोरोना आणि अफवांचा ‘संसर्ग’!

Image
आधुनिक शिक्षण, मिळालेले ज्ञान आणि आत्मसात केलेल्या बुद्धीच्या जोरावर आजचा माणूस प्रगत आणि संवेदनशील झाला असल्याचे मानले जात असले तरी, अद्यापही तो 'समजूतदारपणा'च्या कसोटीवर खरा उतरला नसल्याचे सभोवताली घडणार्‍या घटनांवरून समोर येत आहे. सध्या कोरोना नावाच्या एका विषाणू संसर्गाने अवघ्या जगात धुमाकूळ घातला आहे. चीनच्या भूमीतून निघालेला कोरोना व्हायरस आता भारतासहित जगाच्या जवळपास प्रत्येक देशात जाऊन पोहोचला आहे. या विषाणूंच्या संसर्गाने सगळ्या व्यवस्थांना धक्का दिला असून सर्वत्र आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. या साऱया पार्श्वभूमीवर संयम, शिस्त, स्वच्छता आणि जबाबदारी यांचे पालन करत कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी पुढे येण्याची गरज असताना काही लोक मात्र अफवा, अज्ञान, भीती आणि समज- गैरसमजाचा संसर्ग पसरविण्यात गुंतले असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. 'अमूक भागात 'करोना'चे आणखी दोन रुग्ण आढळले..., करोनावर टमुक संस्थेने औषध शोधले आहे आहे.., मास खाल्ल्याने करोनाचा प्रादुर्भाव होतो..तर अमुक खाल्याने करोनाचा संसर्ग होत नाही..!' अशा अनेक अफवा सोशल मीडियाच्या माध

भीती नको सावधगिरी हवी!

Image
भीती नको, सावधगिरी हवी! चीन, दक्षिण कोरियासह जगातील विविध देशांमध्ये हाहाकार उडवणारा करोणा व्हायरस भारतात देखील दाखल झाला आहे. पुणेसारख्या शहरात पाच रूग्ण, केरळमध्ये एक बळी, काेरोना रुग्णांचा देशात पोचलेला सत्तरच्या वरचा आकडा  आणि काही शहरांमध्ये संशयित रुग्ण आढळणे, ही निश्चितपणे धोक्याची घंटा म्हणता येईल. त्याची  दखल आपण घेतली पाहिजे. दाटीवाटीच्या आणि आफाट लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात करोना सारखा व्हायरस  पसरला तर त्यातून मोठय़ा जनसंख्येच्या जिवीताला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे हे संकट गंभीर आहे. त्याचा मुकाबला गांभीर्याने केला पाहिजे. सरकार त्या दिशेने प्रयत्न करीत आहे. देशातले डॉक्टर त्यासाठी झटत आहेत. अशा वेळी सरकारकडून आणि वैद्यकीय क्षेत्राकडून आलेल्या सूचना आपण  प्रामाणिकपणे पाळायला हव्यात, स्वीकारायला हव्यात. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकार, प्रशासन , आरोग्य यंत्रणा त्यांच्या पद्धतीने कार्यरत आहेतच. मात्र या कार्यात त्यांना आपलीही साथ मिळाली पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी या आजाराचा प्रसार वेगाने होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक मोठमाठे कार्यक्रम, समारं

कर्माची फळं ?

Image
दैव देते अन् कर्म नेते’ ही मराठी म्हण मध्यप्रदेश काँग्रेसच्या बाबतीत अगदी शब्दशः खरी ठरू पाहत आहे. पंधरा वर्ष विरोधात बसल्यानंतर २०१८ ला झालेल्या निवडणुकीत दैवाने काँग्रेसला मध्यप्रदेशच्या सत्तेवर बसण्याची संधी दिली. मात्र, पक्षांतर्गत धुसफूस, नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस नेत्यांचं कर्म कमी पडलं आणि आज माजी केंद्रीय मंत्री तथा युवा काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्यामुळे कमलनाथ सरकार अडचणीत आले आहे. काँग्रेसमध्ये दखल घेतल्या जात नसल्याचा आरोप करून ज्योतिरादित्य सिंधिया यांनी होळीच्या दिवशी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यापाठोपाठ त्यांच्या २२ समर्थक आमदारांनीही आपले राजीनामे राज्यपालांकडे दिले आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आल्याचा दावा केल्या जातोय. अर्थात, मध्य प्रदेशात सरकार कमलनाथ यांचे राहणार की भाजपचे हे फ्लोअर टेस्टनंतरच स्पष्ट होईल. मात्र ज्योतिरादित्य सिंधियाच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. देशभरातील राज्याराज्यात भाजप विरोधी लाट निर्माण होत असताना मध्यप्रदेश सारखे राज्य काँग्रेसच्या हातून निसटणे ही बाब निश्चितच क