Posts

Showing posts from December, 2017

निर्दोष घोटाळा!

Image
निर्दोष घोटाळा ! देशाच्या अर्थकारणालाच नाही तर राजकारणालाही कलाटणी देण्यास कारणीभूत ठरलेला 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी मंत्री ए. राजा यांच्यासह सर्व १९ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. देशात घडलेल्या एकंदर गैरव्यव्हारापैकी 2 जी स्पेक्ट्रम चा गैरव्यवहार सर्वात मोठा समजला जात होता. ‘कॅग’सारख्या संस्थांनी तर यात एक लाख ७० हजार कोटी रुपयांचे सरकारी नुकसान झाल्याचे अहवाल दिले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश सीबीआय ला दिला. यात माजी मंत्री राजा, द्रमुक नेते करुणानिधींची कन्या खासदार कनिमोळी व १९ जणांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. घोटाळ्याच्या आकडेवारीच्या कथा एवढ्या मोठ्या सांगण्यात आल्याने सहाजिकच यात राजकीय आरोप-प्रत्यारोपाचे अनेक अंक बघायला मिळाले. यूपीए-२ सरकारच्या पतनास कारणीभूत ठरलेल्या अनेक कारणांपैकी स्पेक्ट्रम घोटाळा हे मुख्य कारण ठरले. कारण या घोटाळ्यानंतर देशात युपीए सरकारची मोठी बदनामी झाली. समाजसेवक अण्णा हजारे यांना भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करावे वाटले.

शिक्षणाचा उद्योग..!

Image
‘शिक्षणाचा उद्योग’ गेल्या काही दिवसापासून शैक्षणिक धोरणांचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. ऐन शैक्षणिक सत्राच्या मध्यात शिक्षक बदल्यांचे काहूर मध्यंतरी उठविण्यात आले होते. त्यानंतर १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. शिक्षणाच्या खासगीकरणाला चालना देणाऱ्या या निर्णयाच्या आदेशाची शाई वाळते ना वळते तोच शिक्षण क्षेत्रावर पुन्हा एक नवा प्रयोग करण्याचा घाट सरकारने घातला आहे. शिक्षण क्षेत्रात खासगी कंपन्यांना एंट्री देण्यासाठी महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुधारणा विधेयक आणण्यात आले असून, बुधवारी ते विधानसभेत संमत देखील करण्यात आले आहे. यामुळे, आता खासगी कंपन्यांना राज्यात कोठेही आणि कोणत्याही माध्यमाची शाळा सुरू करण्यास परवानगी असणार असून, रिलायन्स, टाटा, बिर्ला, अदानी यांसारख्या कंपन्यांनाही राज्यात शिक्षणसंस्था सुरू करण्याची कवाडे खुली झाली आहेत.  त्यामुळे शिक्षणाचा ‘उद्योग’ करण्याचे हे धोरण शिक्षणाला कुठे घेऊन जाणार याबाबत चिंता व्यक्त केल्या जातेय.. अर्थातच, कंपन्यांच्या शाळा शिक्षणावर कसा परिणाम करतील याचे मूल्यमापन काळाच्या कसोटीवर क

कन्हत..कुंथत..!

Image
Adv Haridas Umbarkar December 19   ·  🌸  * #कन्हत ..  #कुंथत ..!* 🌝 👉  _* मराठी ही मोठी अलंकारिक भाषा आहे. एका शब्दाचे अनेक अर्थ असणे आणि एकाच अर्थाचे अनेक शब्द असणे हे आपल्या मातृभाषेचे वैशिष्ट्य.. 'निकाल लागला' हा शब्द सुद्धा असाच दोन आशयांनी येणारा. निकाल लागला, असं सौम्यपणे म्हटलं तर निकाल घोषित झाला, असा त्याचा सरळ अर्थ. परंतु हाच शब्द दुसऱ्या संदर्भाने उच्चारला तर त्याचा भलताच अर्थ निघतो. हा संदर्भ याठिकाणी देण्याचे कारण एव्हडेच कि, भवि ष्यातील अनेक गोष्टींचा निकाल स्पष्ट करणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणूक निकालांचे विश्लेषण ही असंच आहे. या निवडणुकीत काहींसाठी हा 'निकाल लागला' आहे तर काहींचा यात 'निकाल लागला' आहे.*_ _गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पुढील अनेक निकालांचे भवितव्य अवलंबुन असल्याने देशात आजवर झालेल्या तमाम विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यावेळची गुजरातची निवडणूक सर्वांसाठीच प्रतिष्ठेची ठरली. म्हणून तर या निवडणुकीत राजकारणाचे सर्व रंग उधळल्या गेले._ *भाजपा आणि काँग्रेसच्या देशभरातील जवळपास सर्व प्रमुख नेत्यांन

राजकीय सिंचन!

Image

आता, 'न्याय' ही संतापला..!

Image
आता, 'न्याय' ही संतापला..! 'तपास सुरु आहे' असं ठरीव आणि ठाशीव उत्तर देणाऱ्या तपास यंत्रणांना गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. चार वर्ष होतात तरी नरेंद्र दाभोलकर, कॉ पानसरे यांच्या खुनाचा तपास का लागत नाही? दोभोळ्कर, पानसरे यांचे मारेकरी अद्याप मोकाट कसे? असा सवाल विचारत या दोन्ही प्रकरणातील तपासाची सद्यस्थती न्यायालयात दाखल करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. दाभोळकर- पानसरे  हत्येप्रकरणी एका याचिकेवर सुनावणी करत असताना देशातील सद्यस्थतीतवर चिंता व्यक्त करत न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला. लोकशाहीप्रधान देशात विचारवंतावर हल्ले केले जातात, कलाकारांना धमक्या दिल्या जातात. त्यामुळे देशाची प्रतिमा मालिन होत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दाभोळकर -पानसरे प्रकरणाचा छडा लागत नसल्याने सर्वसामान्य जनतेत असलेली संतापाची भावना न्यायालयाने मांडल्याने आता, 'न्याय' ही संतापला..! असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. अर्थात, न्यायालयाचा असो कि सामान्य जनतेचा हा संताप आजचाचं नाही. यापूर्वीही न्यायालयाने अनेकवेळा तपासयंत्रणांना धारेवर धरले आहे. सुधारण

वैद्यकीय 'मेवा'

Image
* वैद्यकीय 'मेवा ' !* 💉 💵 💵 👇 👇 _* डॉक्टरांना देव मानण्याचा आपल्या समाजात प्रघात आहे.. प्रचंड विश्वास आणि वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव यामुळे हि उपाधी डॉक्टरांना मिळाली. असं म्हटलं जातं, देवानंतर जर कुणाचा नंबर लागत असेल तर तो म्हणजे डॉक्टरांचा..कारण, देव आपल्या प्राणाचं रक्षण करतो, हि जशी श्रद्धा आहे. तसाच डॉक्टर आपले प्राण वाचवू शकतो हा विश्वास समाजाचा आहे. त्याचमुळे डॉक्टरांना समाजात सन्मानाचे स्थान  दिल्या जाते..त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला जातो. मात्र, अलीकडच्या काळात या पवित्र क्षेत्रातही काही अपप्रवृत्तीनी शिरकाव केला आहे. वैद्यकीय क्षेत्र 'सेवा' करण्यासाठी नाही तर 'मेवा' खाण्यासाठी असल्याच्या समज असणारे काही लोक या क्षेत्रात आले, आणि वैद्यकीय सेवेचा व्यवसाय केंव्हा बनला, व व्यवसायाचा धंदा कधी झाला, हे कुणालाच कळले नाही. नीतिमत्तेचे सर्व संकेत गुंढाळून रुग्नाचा खिसा कापण्याचे उद्द्योग या क्षेत्रात इमाने-इतबारे सुरु झाले. रुग्नाची लुबाडणूकच नाही तर सामाजिक संकेत पायंदळी तुडवून अवैध गर्भपातासारखे कृत्य करण्यासही मग हि मंडळी मागे राहिली ना

मूळ दुखणे वेगळे- इलाज वेगळा.!

Image
मूळ दुखणे वेगळे- इलाज वेगळा.! शिक्षण विभागाच्या विविध घोषणांनी शिक्षण क्षेत्र व्यथित झाले असल्याची ओरड सुरु असतानाच पुन्हा एका नव्या घोषेंनेनें प्राथमिक शिक्षण व्यवस्थेचे धाबे दणाणले आहे. पटसंख्या कमी असलेल्या १३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने जाहीर केला असून, ज्या शाळांची पटसंख्या १० पेक्षा कमी झाली, अशा शाळांवर आता बंदीचे गंडांतर येणार आहे. अर्थात, 'शाळा बंद' ऐवजी स्थलांतरित हा शब्द  वापरून शासनाने निर्णयामागील त्रीव्रता कमी केली असली तरी. स्थलांतराचे नियम आणि अटींमध्ये ग्रामीण, दुर्गम भागातील विध्यार्थ्याच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उभे राहण्याची श्यक्यता आहे. गुणवत्ता कमी झाल्यामुळे सरकारी मराठी शाळांना पटसंख्येचा रोग जडला. शाळांची गुणवत्ता का खालावत आहे, याचे निदान करून पटसंख्या वाढीसाठी उपचार करण्याची आवश्यकता असताना शाळांवर थेट बंदीची शस्त्रक्रिया करणे म्हणेज 'रोगापेक्षा इलाज भयंकर' असेच म्हणावे लागेल. दहापेक्षा कमी पटसंख्या हे निश्चितच त्या शाळांचे आणि पर्यायाने व्यवस्थेचे अपयश असताना यासाठी दुर्गम भागातील गोरगरीब मुलांना का वेठीस धरल्या जाते