Posts

Showing posts from December, 2019

वर्ष नवे हर्ष नवे

Image
वर्ष नवे हर्ष नवे जुन्या वर्षाचे जाणे आणि नवीन वर्षाचे येणे, हा तसा पाहिला तर काळाचाच प्रवास. तो पृथ्वीच्या जन्मापासून सुरु आहे. विविध मानव समुहांनी आपापल्या सोयीसाठी कालगणना सुरू केली तेंव्हापासूनचे 2019 हे वर्ष आज संपत असून उद्या आपण 2020 व्या वर्षात प्रवेश करत आहोत. वास्तविक एक वर्ष संपून दुसऱ्या वर्षात पदार्पण करत असताना आपल्या दैनंदिन जीवनात काहीच फरक पडणार नाही. आजच्या दिवसासारखाच उद्याचाही दिवस असणार आहे..! पण, हा विचार किती निरस ठरेल नाही का? त्यामुळेच माणसाने आपल्या जगण्यात नवेपन शोधण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे, नववर्ष साजरे करण्याची पद्दतही त्यातूनच रुढ झाली असावी ! आणि, भारतीय लोकमानसात उत्सवप्रियता अगदी ठासून भरली असल्याने नवीन विचारांचे, नव-संकल्पाचे स्वागत करण्यासाठी तो नेहमीच उत्सुक असतो. त्यामुळे, नवे वर्ष आले म्हटल्यावर त्याचे स्वागत करण्यासाठी सगळा देश सज्ज झाला आहे. आजचा 31 डिसेंबरचा दिवस संपून जसजशी सांज चढत जाईल, तसतसे नववर्ष स्वागताच्या उत्साहालादेखील उधाण येईल. अर्थात, नवीन वर्षाचे स्वागत करत असताना प्रत्येकाच्या मनात एक आंतरिक हुरहुर असेलच. वर्ष

ऑल इज नॉट वेल !

Image
सरकार, प्रशासन आणि सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराचा मुद्दा आता घासून घासून गुळगुळीत झाला आहे.  देशात बोकाळलेला भ्रष्टाचार संपवून लाचखोरी करणाऱ्यावर वचक बसावा यासाठी आजवर अनेक आंदोलने करण्यात आली, विविध कायदे आणि नियम आणल्या गेले. 'भ्रष्टाचार निर्मूलन' हा मुदा जनआंदोलनातून बहुतांश राजकीय पक्षांच्या मॅनिफेस्टो मध्ये आला. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाने काहींना 'महात्मा' बनविले, तर काहींसाठी सत्तेच्या राजकारणाची दारे उघडी केली. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांनी निवडणुका जिंकल्या. मात्र, प्रशासन भ्रष्टाचारमुक्त असावे, ही जनसामन्यांची अपेक्षा अद्याप पूर्ण झालेली नाही.  इंडिया करप्शन सर्व्हे 2019 च्या अहवालातुन हे वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे.  ट्रान्सपेरन्सी इंडिया इंटरनॅशनल या स्वतंत्र आणि अराजकीय संस्थेमार्फत देशातील जवळपास 20 राज्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ५१ टक्के भारतीयांनी यंदा कोणत्या ना कोणत्या कारणासाठी लाच दिली असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार केरळ, दिल्ली, हरियाणा, गुजरात, पश्‍चिम बंगाल, गोवा, ओडिशा या

नागरिकत्वाचा घोळात घोळ!

Image
नागरिकत्वाचा घोळात घोळ! नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन देशात धमासन सुरु झाले आहे. विधयेकाचे विरोध व समर्थन करणाऱ्यामध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. एनआरसी अर्थात 'नॅशनल रजिष्टर ऑफ सिटिझन्स'च्या माध्यमातून नागरिकत्व पडताळणीची मोहीम देशभर नेण्याच्या मुद्द्याचा घोळ कायम असतांना केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती बिल आणल्याने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण  निर्माण झाले आहे. भारताच्या शेजारील देशांमधून धार्मिक छळामुळे निर्वासित होणाऱ्या हिंदूंबरोबरच शीख, जैन, बौद्ध, पारशी, ख्रिस्ती या धार्मिक समुदायांना भारताचे नागरिकत्व सहजासहजी मिळावे यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून नागरिकत्व दुरुस्ती विधेयक गरजेचे असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र या विधेयकात मुस्लिम समुदायाला वगळण्यात आल्यामुळे वादाचे मोहोळ उठले आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकात धर्माच्या आधारावर भेदभाव केला जात असल्याने  घटनात्मक मूल्यांच्या गाभ्याला धक्का बसत असून देशाच्या ‘सेक्‍युलर’ रचनेला आव्हान निर्माण होत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जातोय. त्यामुळे नागरिकत्व सुधारणा विधेयक नेमके काय आहे, त्यातील तरतुदी काय आहेत, त्यांना

'ई-नाम' प्रणाली शेतकरी हिताची ठरेल का?

Image
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालास योग्य बाजारभाव मिळावा हा सातत्याने चर्चिला जाणारा विषय आहे. शेतीमालाला चांगला आणि वाजवी भाव मिळावा, याच हेतूने 1964 साली  कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कायदा करण्यात आला होता. 1967 मध्ये हा कायदा अंमलबजावणीत आल्यानंतर शेतीमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळाली. सुरुवातीच्या काळात बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना रास्त दर दिलाही असेल! परंतु, गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांच्या शेतीमालास वाजवी दर देण्यात कृषी उत्पन्न बाजार समित्या असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे, शेतीमाल विक्रीसाठी वेगळं धोरण असावं, अशी मागणी सातत्याने केल्या जाते. याच धर्तीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी उत्पन्‍न बाजार समित्या बंद करून इलेक्ट्रॅानिक नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर मार्केट या व्यवहार पद्धतीचा वापर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे, शेतीमालाची बाजरापेठ, भाव आदी बाबी ऐरणीवर आल्या आहेत. बदलत्या काळानुसार कृषी क्षेत्रातील आधुनिकीकरणाच्या दृष्टीने ई-नाम प्रणाली उपयुक्त ठरु शकेल! त्यामुळे, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी खुल

व्यवस्थांना अंतर्मुख करणारा (अ)'न्याय”?

Image
हैदराबादमधील सामूहिक बलात्कार व खुनाच्या घटनेनंतर भारतीय जनमानसात जो संताप, भीती, तिरस्कार या भावनांचा उद्रेक झाला होता, त्याची जागा आता दिलासा, आनंद, समाधान, अशा भावनांनी घेतली आहे. शुक्रवारी पहाटे या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांनी चकमकीत खात्मा केला. आणि, 'खरा न्याय' झाल्याची प्रतिक्रिया देशभरातून उमटली. बलात्कार आणि खुनासारखं नृशंस अमानवी कृत्य करणाऱया बेदरकार गुन्हेगारांना असाच धडा शिकवला जावा, कोर्ट कचेरयांच्या भानगडीत वेळ न दवडता आशा प्रकरणातील आरोपींना अशीच शिक्षा दिली जावी, ह्या जनभावना देशाच्या विविध स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत. तर दुसरीकडे ह्या घटनेला अयोग्य मानणाराही एक वर्ग आहे. कायद्याच्या राज्यात पोलिसांनी अशाप्रकारे कायदा हातात घेणे हे या वर्गाला रुचलेले नाही. अर्थात, पोलिसांच्या समर्थनातील आवाजाच्या समोर आज त्यांचा आवाज काहीसा क्षीण आहे. तसं बघितलं तर, हैदराबाद एन्काऊंटरनंतर उपस्थित होणारे प्रश्न दुर्लक्षित करण्यासारखे निश्चितचं नाहीत. कारण त्यांचा रोख देशातील न्यायव्यवस्था, पोलीस यंत्रणा आणि एकूणच लोकशाही व्यवस्थेशी निगडित आहे. कायद्याद्वार

भय इथले संपत नाही..!

Image
भय इथले संपत नाही..! मानवप्राणी' असा शब्द उच्चारून मानव देखील या पृथ्वीवरील एक प्राणीच असल्याचे नेहमी उद्धृत केले जाते. मात्र या प्राण्यातही माणूसपण जपले जावे, अशी अपेक्षा कुणी केली, तर ती वावगी ठरू नये. या माणूसपणात एक नैतिकता, सभ्यता, समजदारपणा, भल्या-बु-याची जाण, सद्सद्विवेकबुध्दी, हे विचार समाविष्ट करीत पूर्वापार मानवी वाटचाल होत राहिलेली आहे. मात्र, सध्या अवती-भवती सातत्याने घडणा-या विविध प्रकारच्या विकृत घटनांनी माणसाला माणसाचीच भीती वाटावी, अशी स्थती निर्माण केली आहे. २०१२ मध्ये दिल्लीत निर्भया हत्याकांड घडले, त्यानंतर कोपर्डी, कठुवा, उन्नाव आणि आता हैदराबाद मध्ये एका पशूचिकित्सक डॉक्टर युवतीवर सामुहिक बलात्कार  करून तिला जिवंत जाळण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.  'अमानुष’, ’अमानवी’, ’माणुसकीला काळिमा फासणारी’ हे शब्द सुद्धा जिथे तोकडे पडतील, अशा या घटनांचा जितका निषेध केला जावा तितका कमीच! मानवी रुपात फिरणारी अशी हिंस्त्र जनावरे बघितली की माणसाला खरंच 'माणूसपण' ही संज्ञा वापरावी का? असा प्रश्न निर्माण होतो. हे विधान वाचून कुणालाही वाटेल की, आज शंभर टक