Posts

Showing posts from July, 2017

'बुद्धि' 'बळा' चे राजकारण

Image
बुद्धिबळाप्रमाणेच राजकारण हा बुद्धी, कौशल्य आणि चातुर्याचा खेळ आहे. यातही प्रत्येक चाल विचारपूर्वक आणि प्रतिस्पर्धी काय चाल खेळतोय वा खेळू शकेल, याचा अंदाज बांधून खेळावी लागते. केंव्हा पुढे जायचे, कुठे माघार घ्यायची, कुणाला शह केंव्हा द्यायचा याची टायमिंग ज्याला कळते तो या खेळात यशस्वी होतो. चातुर्य थोडे जरी कमी पडले की फटका हमखास बसतो. याची प्रचिती सध्या बिहारच्या राजकारणात बघायला मिळत आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांनी विधानसभा निवडणुकीत महागठबंधन तयार केले. मोदी लाट असतानाही अनपेक्षितपणे या गठबंधनाला मोठे यश मिळाले. बिहारमध्ये नितीश लालू च्या जोडीने भाजपाला 'मात' दिल्याने राजकीय 'पटा' वर नीतिशकुमार 'राजा' ठरले. आगामी २०१९ च्या निवडणुकीतील मोदीविरोधातला 'चेहरा' म्हणून त्यांना ' मोहरा' बनविण्याचा प्रयत्न सुरु झाला.  मात्र त्यानंतरच्या काळात अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकलेल्या सोप्या परंतु   भेदक चाली लालूप्रसादच काय तर विरोधकही समजू शकले नाही. मोदी- शाह या जोडगळीने आपल्या 'बुद्धि'

.. ज़रा याद करो कुर्बानी !

Image
…जरा याद करो कुर्बानी भारतात घुसखोरी करून कारगिलवर ताबा मिळवू पाहणाऱ्या पाकड्यांना भारताच्या शूर जवानांनी परत पळवून लावल्याच्या घटनेला आज 18 वर्षे पूर्ण होत आहेत. कारगिलमधील विजयाचा हा दिवस भारतात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. नापाक इरादे मनात ठेवून पाकिस्तानने भारतीय सरहद्दीत प्रवेश केला त्यानंतर पाकड्यांना पुन्हा त्यांच्या भूमीत पळवून लावण्यासाठी भारतीय जवानांना जवळपास 80 दिवस संघर्ष करावा लागला होता. अजूनही या युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तितकीच जिवंत आहे. जगातील सर्वांत उंच पर्वतरांगांमध्ये कारगिलचे युद्ध झाले होते. या युद्धात पाकिस्तानचे साडेचार हजाराहून अधिक सैनिक मारले गेले तर भारताचे पाचशेच्या वर सैनिक आणि हजाराहून अधिक जवान या युद्धात शहीद झाले. अभूतपूर्व साहस, जाज्ज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, नि:सीम धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर एकीकडे अपुरा शस्त्रसाठा, प्रतिकूल निसर्ग आणि दुसरीकडे अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यांवर मात करत, आपल्या जिवाची तमा न बाळगता भारतीय सैन्याच्या वीर जवानांनी ना 'पाक' सैन्याला भारतीय सीमेतून हुसका

योजना तशी चांगली, पण..

Image
'शेतकरी’ नावाचा घटक हा सध्या फार संवेदनशील झाला आहे. सातत्याने अस्मानी प्रकोपाचा सामना कारवा लागत असल्याने आजची शेती कोलमडून पडण्याच्या मार्गावर आहे. लहरी आणि अनियमित पाऊस याचा तर अभिशापच राज्यातील शेतकऱयांना लागला असल्याने नापिकी आणि नुकसान नित्याचेच झाले आहे. या प्राश्वभूमीवर शेतीसुधारनेचा भाग तसेच जलव्यस्थापन व दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठिबक सिंचन वापरणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रचलित पद्धतीनुसार उसाला पाणी देण्यासाठी पाईपलाईन किंवा थेट पाट पाडून पाणी दिले जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. तसेच जमिनीचीही धूप होते. शिवाय कमी पाणी असलेले शेतकरी बागायती शेती करू शकत नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे अचूक नियोजन करून जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्याच्या उद्देशाने ठिबक सिंचनाच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी सरकार शेतकऱ्यांना २ टक्के व्याजाने हेक्टरी ८५ हजार रुपयांचे कर्ज देणार असल्याची घोषणाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली आहे. मानव पाणी निर्माण करू शकत नाही, त्यामुळे जमिनीवर पडणाऱ

पक्ष उदंड जाहले..!

Image

माँ जिजाऊ च्या लेकी असुरक्षित...।

Image
माँ जिजाऊ च्या लेकी असुरक्षित...। महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला स्त्री शिक्षण आणि स्त्री समानतेची फार मोठी परंपरा लाभली आहे. स्त्री भ्रूण हत्या असो कि मुलींचा विकास यासाठी राज्य नेहमीच अग्रेसर राहिले आहे. मुलीना दत्तक घेवून त्यांचा साभाळ करण्यातहि महाराष्ट्राचा नंबर अव्वलस्थानी लागतो.. ' मां नही तो बेटी नही, बेटी नही तो बेटा नही', पहिली बेटी धनाची पेटी, 'मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते  घरोघरी' अश्या घोषवाक्यांमधून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी राज्यात नेहमीच प्रोस्त्चान दिले जाते. अलिकडच्या काळात शासनासमवेत अनेक स्वयंसेवी संस्था सक्रीयपणे स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी योगदान देताना दिसत आहेत. मात्र तरीही राज्यातील १४ जिल्ह्यामध्ये मुलींच्या जन्मदरात अजूनही घट होत असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. बीड, जालना,जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, बुलडाणा, वाशिम, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यात मुलींचा जन्मदर सरासरीपेक्षा कमी नोंदविला गेला आहे.. कायद्याचा धाक व जनजागृतीचा डोस देवूनही जनमानसात म्हणावे तसे मतपरिवर्तन झाले नसल्याचे मन विषण्‍ण कर