Posts

Showing posts from June, 2020

तुझा विसर न व्हावा !

Image
पंढरीची वारी' हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे. ईश्वरनिष्ठाच्या मांदीयाळीचं असे अनोखे रूप जगात कोठेही पहावयास मिळत नाही. कपाळावर बुक्का, गळ्यात तुळशीची माळ, हातात टाळ, खांद्यावर पताका आणि मुखाने विठ्ठलनामाची गर्जना करत आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी जाणारा लाखोचा वैष्णव मेळा म्हणजे विठ्ठलभक्तीचा महापूरच. परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे पायी वारी रद्द करण्यात आली आहे. आजवर वारीच्या मार्गात अनेक अडचणी आल्या. वादळ, महापूर, दुष्काळ..  साथीच्या रोगाचे थैमानही वारीला रोखू शकले नाही. 'माझ्या जीवीची आवडी | पंढरपुरा नेइन गुढी ||' ही माऊली ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा शेकडो वर्षापासून वारकरी पूर्ण करत राहिले. मात्र, कोरोना नावाचा काळ यावर्षी असा आडवा आला की वारीची परंपरा अडचणीत आली आहे. संपर्कातून कोरोना संक्रमणाचा धोका असल्याने माऊली भक्तांच्या सुरक्षेचा विचार करून राज्य शासनाने  पालखी सोहळा कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत आणि शासकीय नियमांनुसार करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे, यावेळी पंढरपुरात कोणताही मोठा सोहळा नाही, दिंड्या नाही, चंद्रभागेच्या तीरावर वैष्णवांचा मेळा जमा होणार

उमेद मरु देऊ नका!

Image
कोरोना संसर्गाची साथ आणि त्यानंतर आलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटात होरपळणाऱ्या सामान्य माणसांचे उरलेसुरले अवसान इंधन दरवाढीने गळून पडले आहे. देश अनलॉक झाल्याच्या पंधरवड्यात पेट्रोल लिटर मागे साडे आठ रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी महाग झाले. गेल्या 18 दिवसापासून महागाईचा हा खेळ सुरू असून दिल्लीत तर या महागाईने नवा विक्रम नोंदवला. आजवर डिझेलच्या किमती कधीही पेट्रोलच्या वर गेल्या नव्हत्या परंतु राजधानीत डिझेल पेट्रोल पेक्षा बारा पैशांनी महाग झाले आहे. टाळेबंदीमुळे देशात आधीच अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झालेले आहे. सरकारी नोकरदारांचे पगार नाहीत, खाजगी क्षेत्रात तर नोकऱ्या टिकतील की नाही, याचीच शाश्वती उरलेले नाही. बंदने व्यावसायिकांचे कंबरडे मोडून पडले आहे. आर्थिक घडी विस्कळीत झाल्याने सर्वसामान्य माणूस हवालदिल झालेला असताना हा महागाईचा चटका दाहक ठरतो आहे. वास्तविक आशा नाउमेदीच्या काळात सरकारने जनतेचं मनोबल कायम राखण्यासाठी सरकारी तिजोरी खुली करायला हवी! परंतु, भारत सरकार मात्र इंधनावरील अतिरिक्त करातून मिळणाऱ्या महसुलावर लक्ष ठेवून आहे. टाळे बंदीमुळे ठप्प झालेलं अर्थचक्

बोथट बहिष्कारास्त्र ?

Image
चीनने भारताशी लडाख सीमेवर गलवान खोर्‍यात आगळीक केल्यानंतर संपूर्ण भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटणे सुरू झाले होते. रेल्वेसह अन्य सरकारी आस्थापनांनी याआधी चिनी कंपन्यांना दिलेली कंत्राटे रद्द करत तसेच  भारताच्या सीमांशी सीमा भिडलेल्या देशांतील परकीय गुंतवणुकीवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेत  केंद्र सरकारने चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी पाऊले उचलायला सुरुवात  केली. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अंतर्गत चिनी कंपन्यांसोबत करण्यात आलेले तीन करार स्थगित करून महाराष्ट्रानेही या अर्थयुद्धात आपला सहभाग नोंदवला. नागरिकांनीही सरकारला साथ देत  #BoycottChina म्हणजेच चिनी वस्तू-उत्पादनांवर बहिष्काराची मोहीम सुरु करून चीनवर बहिष्कारास्त्राचा मारा केला. पण, जशा सीमेवरील कलह निवळन्याच्या बातम्या येऊ लागल्या तशी या बहिष्कारास्त्राची धार बोथट होऊ लागल्याची दिसते आहे. दोन दिवसापूर्वी चिनी मालाची होळी करणार्‍यांच्या भडकलेल्या भावना आता काहीश्या शांत झाल्या.. सोशल मीडियावरील निषेधाचे सूरही  बरेच थंडावले दिसत आहेत. इतकेच नाही तर, सरकारी पातळीवरही पुनरविचाराची गुऱ्हाळे सुरू झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे चीन विरोधा