Posts

Showing posts from August, 2019

लोक काय म्हणतील?

लोक काय म्हणतील ? “लोक घोड्यावर बसू देत नाही आणि पायीही चालू देत नाहीत..!” हा अनुभव सार्वजनिक आहे. तरीही ‘लोक काय म्हणतील ?’ याचाच विचार कोणताही निर्णय घेतांना केला जातो. आपल्या प्रत्येक कृतीवर, अगदी सार्वजनिक जीवनापासून ते वयक्तिक आयुष्यापर्यंत, राहणीमानापासून ते खाण्यापिण्यापर्यंत कुठलीही आवड- निवड ठरवितांना या तथाकथित ‘लोकां’चा विचार आपण करतो. अर्थात, माणूस हा समाजशील आणि समाजाचाच एक भाग आहे, समाजाने आखून दिलेल्या काही नियमांच्या, बंधनाच्या कळत-नकळत मर्यादा असतात. त्या मानायला हाव्यातचं. पण, बहुतांश वेळा ‘लोक काय म्हणतील’ याचा बागुलबुवा करुन आपल्याला आवडणारा पण आजूबाजूच्या लोकांना न रुचणारा निर्णय आपण घेत नाही. आपले वागणे, बोलणे, पेहराव, कृती यात आपण स्वतःच्या मनाला पद्धतशीरपणे बाजूला सारून लोकांच्या मातांना प्राधान्य देतो. आणि, मनातील अनेक गोष्टी प्रत्यक्षात करतचं नाही. त्यामुळे लोकांची ही निर्रथक भीती अनेकांच्या प्रगतीत स्पीडब्रेकर बनली आहे. लोकलज्जेचा हा विषाणू माणसाच्या रक्तात इतका भिनलाय कि, ‘लोक काय म्हणीतील’ या भीतीपोटी स्वकीयांचे मुडदे पाडण्यापर्यंत माणसाची मजल गेलीय. ‘ल