Posts

Showing posts from September, 2017

सीमोल्लंघन ज्याचे त्याचे..!

Image
☘ *दसऱ्याचा मुहूर्त सिमा ओलांडण्यासाठी उपयुक्त समजला जात असला तरी, राजकारणात सीमा पार करण्यासाठी मुहूर्तपेक्षाही योग्य 'टायमिंगची' गरज असते... यंदाच्या _शिलांगनात_ कोण साधनार टाइमिंग??*🏹 ☘🍀🏹🏹🍀☘🏹🏹🍀☘ *'सीमोल्लंघन' ज्याचे त्याचे.!* 🏹🏹☘☘🏹🏹☘☘🏹🏹 *_कोणत्याही मह्त्वाकांक्षी योजनेच्या किंव्हा मोहिमेच्या शुभारंभा साठी सीमोल्लंघन दसऱ्याचा मुहूर्त उत्तम मानला जातो. दसरा हा विजयाचा दिवस ! त्यामुळे त्याला विजयादशमी असेही म्हणतात. या दिवशी सीमोल्लंघन करण्याची प्रथा असल्याने पूर्वी राजे महाराजे याच दिवशी मोहिमांची सुरवात करत असत. परंतु बदलत्या काळानुसार देशात राजेशाही जाऊन लोकशाही आली, आणि लोकशाहीमध्ये सीमोल्लंघन केवळ नवा प्रदेश जिंकण्यासाठी नाहीतर.. नवा विचार जिंकण्यासाठी केले जाण्याची पद्दत रूढ होऊ लागली. फक्त आपट्याच्या पानांचं सोन नाही तर विचारांचं सोन लुटण्याचा प्रघात राजकारणात सुरु झाला. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्ताला एक आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. या दिवशी विविध पक्ष संघटनांचे मेळावे होतात. या मेळाव्यातून नव्या विचारांचे आणि नव्या घोषणांचे सीमोल्लंघन के

विकास वेडा झालाय..?

Image
💥💥💥💥💥💥💥💥💥 *'विकास' वेडा झालाय..?* 👇👇 _गुजरात मध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीत 'विकास वेडा झालाय' या उपहासात्मक टीका मोहिमेने सत्ताधारी भाजपाला हैराण करून सोडले आहे. विकासाची भाषा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होमग्राऊंडवर सोशल मीडियामध्ये टीकेची उठलेली ही राळ अर्थातच निवडणुकीचा एक भाग आहे. याचा गुजराथ निवडणुकीवर काय परिणाम होईल, त्याठिकाणी कोण निवडणून येईल, हा आपला मुद्दा नाही. परंतु, ज्या राज्याला विकासाचं मॉडेल म्हणून एकेकाळी देशासमोर मांडण्यात आलं होतं, त्याच राज्यातील जनतेनें 'विकास वेडा झालाय, तो थांबायला तयार नाही' अशी खिल्ली उडवावी, म्हणजे जरा अतीच झालंय..असं म्हण्यायला हरकत नाही._ तसही गेल्या तीन वर्षापसून सुरु असलेले केंद्र सरकारचे *'विकासपुराण'* आणि त्याचे *'परिणाम'* बघितले तर *हा उपहास फक्त गुजरातमधल्या जनतेच्याचं मनातला नाही, तर काही ठराविक 'अच्छे दिन' आलेला वर्ग सोडून, संपूर्ण देशातील सर्वसामान्य जनतेच्या मनातही हीच भावना आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.* _'विकास' म्हणजे नेमकं काय?,

नारिशक्तिचा उत्सव

Image

कोठे नेवुन ठेवला महाराष्ट्र माझा??

Image
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? भारतीय जनता पक्षाने मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वापरलेले बहुमाध्यमी प्रचारतंत्र हे सर्वांगाने प्रभावी प्रचारतंत्र होते, असे आजवरच्या इतिहासात मानले गेले आहे. जनतेच्या मनातील प्रश्नांना हात घालून, हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देत, भाजपाने मत मागीतली होती. लोकसभा निवडणुकीतील 'अच्छे दिन' ची घोषणा, तर राज्य पातळीवर 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?, या आघाडी सरकारला जाब विचारणाऱ्या जाहिरातीच्या माध्यामातून त्यांनी जनतेच्या मनाला हात घातला. जाहिरातींसाठी समाजातल्या रंगल्या-गांजल्यांची प्रतिनिधिक पात्रे उभी करून भ्रष्टाचार, वीजटंचाई, महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आदी मुद्यांवर तत्कालीन आघाडी सरकारला प्रश्न विचारण्यात आले. या जाहिराती म्हणा किंव्हा घोषणा, यामुळे जनमताचा कौल भाजपाच्या बाजूने गेला, आणि भाजपाला सत्ता मिळाली. परंतु, भाजपा सरकारच्या दोन-तीन वर्षांच्या सत्ता काळानंतरही जनसामान्यांचे 'सामान्य' प्रश्न कायमच असून ते सुटण्याऐवजी अधिक जटील बनले आहे. त्यामुळे, ज्या सोशल मीडियात एकाकाळी भाजपाच्या जाहिरातीची क्रेझ होती, आ

विवेकाचे दिप विझनार नाहीत..!

Image
*_"विचार पटत नसतील तर विरोध करावाच..मात्र विचार मांडण्याची काहीतरी आचारसंहिता असावी. एकाद्याच्या मरणावर आनंद व्यक्त करून असुरी जल्लोष करणाऱ्याना आपली कोणती संस्कृती दाखवायची आहे."_* 👊👊👊👊👊👊👊 *विवेकाचे दिप विझनार नाहीत..!* 👊👊👊👊👊👊👊👊          *अँड. हरिदास उंबरकर*                           👉 _बंदुकीच्या गोळीने विचार संपविता येत नाही, हे सत्य अनेकवेळा अधोरेखित झाले आहे. महात्मा गांधी पासून ते दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येनंतर त्यांचे विचार अधिक प्रखर बनून 'अमर' झाले. मात्र, तरीही विचारांची लढाई विचारांनी करण्यापेक्षा व्यक्तीलाच संपविण्याची भ्याड प्रवृत्ती देशात वाढीस लागत आहे._ २० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, त्याच पद्धातीने कॉम्रेड गोविंदराव पानसरे, एम. एम कलबुर्गी यांच्याही हत्या करण्यात आल्या.आता या यादीत आणखी एक नाव सामील झाले आहे. *सुप्रसिद्ध पत्रकार आणि बंगळुरू येथील “लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांची ही त्याच ‘मोडस ऑपरेंडी’ ने हत्या करण्यात आली. या चारही जणा