Posts

Showing posts from August, 2017

राजनैतिक विजय

Image
'राजनैतिक विजय' भारताला 'युद्ध' नाही तर 'बुद्ध' हवा असल्याचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० व्या स्वातंत्र्यदिनानिमीत्य संपूर्ण जगाला दिला होता. त्याचसोबत आगळीक करणाऱ्याला 'जश्यास तसे' उत्तर देण्यात येईल असा इशारा देऊन भारत कोणत्याच दबावापुढे झुकणार नसल्याचे जाहीर केले. डोकलाम खोर्‍यावर दावा सांगत चीन भारतीय सेनादलाशी धक्‍काबुक्‍की करण्याच्या पावित्र्यात असताना पंतप्रधानांची ही नरमाईची भूमिका अनेकांना कोड्यात टाकणारी होती. मात्र, चीनच्या आगाऊपणाचा  मुत्सद्देगिरीने सामना करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. एका बाजूला चीनच्या सैन्यासमोर भारताचे सेनादल उभे केले तर दुसरीकडे चिनी अधिकारी, चिनी मीडिया डोकलाम प्रकरणी वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत असताना भारताकडून कोणतीच आक्षेपाहार्य टीका टिपणी करण्यात आली नाही. माघार ही नाही आणि आगळीकही नाही अशी ठाम भूमिका भारताने अत्यंत संयमीपणाने हा मुदा हातळाला. अखेर चिनी फौजेला शेपूट घालून माघार घ्यावी लागलेली आहे. दोन देशांच्या मुत्सद्दी मंडळींच्या एकत्र बैठकीतून तसा निर्णय घेतला असून डोकलाम प्रकरणी यशस्वी तोडगा

ऐसे कैसे झाले भोंदू?

Image
*ऐसे कैसे झाले भोंदू ..?* 👉 _‘रंजल्या-गांजल्यांना आपले म्हणणारा तो साधू..’ज्याची वृत्ती स्थिर आणि प्रसन्न असते.. ज्याच्या मनी विषयोपभोगाची आसक्ती नसते' जो जनकल्याणासाठी आपली 'साधना' खर्च करतो तो साधू..' साधु-संतांची ही व्याख्या तुकाराम महाराजांनी साढे-तीनशे वर्षापुर्वी सांगितली होती. मात्र एकविसाव्या शतकातही आपल्याला त्यातील मर्म कळू नये यासारखी दूसरी शोकांतिका नाही._ आजचा प्रगत म्हणवला जाणारा माणूस श्रध्देची पट्टी डोळ्यावर बांधून संधीसाधू बाबांच्या नादी लागला आहे.. नुसता नादी लागला नाही' तर त्याने आपला विवेक सुद्धा गहान ठेवल्याचे जाणवत आहे. दोन दिवसांपूर्वी सिरसा येथील डेरा सच्चा सौदा या आश्रमाचा प्रमुख गुरुमीत रामरहीम सिंग याला विशेष सीबीआय न्यायालयाने बलात्काराच्या आरोपात दोषी ठरविल्यानंतर त्याच्या समर्थकांनी  जे रनकंदन केले, जो हिंसाचार घडविला. त्याने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. *कोण हा रामरहीम ? त्याचा एवढा दरारा का ? त्याला आणि त्याच्या समर्थकांना इतका कसला माज आहे कि भारतीय न्यायव्यवस्थेला आव्हान देण्यापर्यंत त्याची मजल जावी ? आणि प्रशासन..ते तर तिन दिवस

'श्रीं' चे स्वागत

Image

Who Killed दभोळकर??

Image
हू किल्ड दाभोळकर ? पुरोगामी चळवळीचे आधारवड आणि महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलनाचे अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन उद्या बरोबर चार वर्ष पूर्ण होत आहेत. अंधश्रद्धा दूर करून विवेकवादी समाजाच्या निर्मितीसाठी झटणाऱ्या या समाजसुधाराकाचा सुसंस्कृत आणि कधीकाळी सामाजिक चळवळीचे केंद्रबिंदू राहिलेल्या पुण्यात निर्घृण खून करण्यात आला.. प्रबोधनाच्या परंपरेवर विश्वास ठेवून विचारांची लढाई विचाराने लढणाऱ्या या कार्यकर्त्यांचा विचार बंदुकीच्या गोळीने संपविण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला होता. परंतु, हत्येने व्यक्तीचे विचार संपत नसतात. उलट ते विचार अजून प्रखर बनतात याची प्रचीती महत्मा गांधी पासून ते दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येनंतर हि आली आहे. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर ज्या कायद्यासाठी दाभोळकरांनी जीवाचे रान केले तो 'अंधश्रद्धा निर्मूलन कायदा' राज्य सरकारने मंजूर केला.अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या अनेकांना या कायद्यामुळे जरब बसला आहे. अंधश्रद्धामुक्त समाजाचे जे स्वप्न डॉ. दाभोळकारांनी पाहिले होते, त्या दिशेने आज समाजाची वाटचाल सुरु असल्याचे बोलले जात

तिहेरी तलाक नाकबुल..!

Image
भारतीय राज्यघटनेत सार्वभौम सत्तेसंबंधी जाहीर भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. संविधानाणे या देशातील प्रजेला 'सार्वभौम' म्हटलं आहे. प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचा अधिकार देत, जात-धर्म,  गरीब-श्रीमंत, उच्च-नीच,वंश,लिंग, वर्ग, असा कोणताच भेदभाव नागरिकांमध्ये करण्यात येणार नाही. असा विश्वास आणि अधिकार  राज्यघटनेने देशातील सर्व नागरिकाना दिला आहे. याच आधारावर काल सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकची पद्दत रद्द ठरवीत एक ऐतिहासिक आणि पुरोगामी असा निर्णय दिला. तिहेरी तलाक प्रथेमुळे राज्यघटनेच्या चौदाव्या कलमाने दिलेला समानतेचा हक्क हिरावून घेतला जातो, असे स्पष्ट करून हि प्रथा रद्द करण्यात यावी व याविरोधात कायदा करण्याचा आदेश संसदेला दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय अनेक अर्थानी स्वागताहार्य म्हणावा लागेल. ऐतिहासिक, पुरोगामी, सुधारणावादी आणि आधुनिक अशी अनेक विशेषणे या निर्णयाला देता येतील. भारतात कोणीही मुस्लिम पती तीनदा तलाकचा तोंडी किंव्हा  फोनवर उच्चार करून आपल्या पत्नीला काडीमोड देऊ शकत होता, मात्र आता मुस्लिम महिलांना कायद्याचे संरक्षण मिळणार असल्याने त्यांची घु