Posts

Showing posts from June, 2019

शेतकऱ्यांना मुक्त करा

शेतकऱ्यांना 'मुक्त' करा  शेती व्यवसाय 'प्रगत' आणि 'समृद्ध' करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आजवर अनेकदा अधोरेखित करण्यात आली. शेतीच्या विकसितकरणासाठी नवनवीन संशोधनाच्या घोषणाही बऱ्याचदा करण्यात आल्या. मात्र अंलबजावणीच्या पातळीवरील सगळ्या चर्चा आणि घोषणा वांझोट्या ठरत असल्याचे चित्र समोर येत असून त्यामुळे शेतकरी आणि सरकार यांच्यात नवनव्या मुद्यावरून संघर्ष उफाळून येत आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे, प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांची पेरणी. जनुकीय सुधारित बियाणे उत्पादन आणि खर्चाच्या दृष्टिकोनातून परवडणारे असल्याने ते पेरण्याची परवानगी देण्याची मागणी शेतकरी वर्ग मागील अनेक वर्षापासून करतोय. मात्र, पर्यावरणातील जैवविविधता धोक्यात येण्याची शंका समोर करून सरकारने हे अत्याधुनिक तंत्रज्ञान नाकारण्याचा आडमुठेपणा सुरु ठेवला आहे. अर्थात, प्रतिबंधित बियाण्याच्या लागवडीमुळे पर्यावरणाला धोका असल्याचे निष्कर्ष शास्त्रोक्त पद्धतीने समोर आले असते तर शेतकऱ्यांचा हा आग्रह चुकीचा ठरवता आला असता. परंतु गेल्या दशकभरपासून या बियाण्यावरील संशोधनाचा विषय भिजत ठेवून पर्यांवरण संरक्ष

प्रतिक्षेचा सुखांत !

प्रतिक्षेचा सुखांत! मान्सून सरींसाठी 'अधीर' झालेल्या मनांना काल कोसळलेल्या पावसाने ‘झिंग झिंग झिंगाट..’चा अनुभव दिला. मागील चार पाच महिन्यात उन्हाच्या झळांनी जनता 'बधिर' झाली होती, त्यातच दुष्काळ, पाणी टंचाई आदी समश्यानी शेतकरीराजासह नागरी वस्तीतील जनतेलाही हैराण केलं होतं. मान्सूनबाबत वर्तविण्यात आलेल्या वेगवेगळ्या भाकीतामुळे देखील शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला होता. रोहिण्या लागल्या.. जून महिना सुरू झाला..मृग सरला तरी मोसमी वाऱयांना महाराष्ट्राचा रस्ता सापडत नव्हता. शेतकऱयांनी शेती मशागतीचे काम पूर्ण करून मिळेल त्या मार्गाने पेरणीसाठी पैसा उभा केला, पण मान्सून वारंवार हुलकावणी देत होता. सात जूनला केरळमध्ये दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांचा मराठी मुलखाकाकडे प्रवास सुरु होताच वायु चक्रीवादळाचे विघ्न आले आणि मान्सूनची दिशा बदलली. त्यामुळे बळीराजाच्या काळजाचा ठोका वाढला.. यावर्षीही दुष्काळाचा राक्षस पुन्हा मानगुटीवर बसणार की काय, या भयाने तो ग्रासला होता. अखेर चिंताक्रांत झालेल्या बळीराजाची पर्जन्यदेवतेला दया आली, आणि मान्सून रंगात आला.. मेघाच्या गडगडाटासह पावसाला सुरवात