Posts

Showing posts from September, 2019

काँग्रेसचा 'प्रेरक' प्लान

काँग्रेसचा 'प्रेरक' प्लान कोणत्याही निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागणारच असतो..पराभूत नेहमी हेटाळणीचे धनीच होत असतात, हे सत्य असलं तरी 'कोणताही पराभव अंतिम नसतो आणि विजयही कायमचा नसतो.' हेदिखील वास्तव आहे. त्यामुळेच निवडणुकीतील पराभव पचवून पक्ष पुन्हा उभे राहतात. किंबहुना, जो पक्ष उभा राहतो त्यांचंच अस्तित्व कायम राहतं ! 'जिंकण्यासाठी पुन्हा लढणे याशिवाय दुसरा पर्याय नाही..!' असं म्हटल्या जाते ते त्यामुळेच. या चर्चेचं औचित्य असं कि, लोकसभेच्या पराभवामुळे सैरभैर झालेल्या काँग्रेसनेही पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाची धुरा पुन्हा आपल्या हाती घेऊन रचनात्मक कार्यक्रम राबवून पक्षसंघटना मजबूत करण्याचा मनोदय नुकतंच काँग्रेस बैठकीत मांडला. नेते आणि जनतेत संवादाचे पूल उभारून काँग्रेसची तळागळातील फळी नव्याने मजबूत करण्यासाठी 'प्रेरक प्लान' द्वारे नव्या पिढीशी जळूवन घेण्याचा पक्षाचा प्रयत्न दिसतोय. पराभवाची मानसिकता झुगारून काँग्रेस पुन्हा लढण्यासाठी सज्ज होत असेल तर ही काँग्रेसजणांसाठी सकारात्मक ब