Posts

Showing posts from May, 2019

यश तुमचंच आहे..!

यश तुमचंच आहे..! आज बारावीचा निकाल जाहीर होतोय..पुढच्या आठवड्यात दहावीचा आणि त्यानंतर नीट, जेईई, सीईटी आदी परीक्षांचे निकाल जाहीर होणार असल्याचे संकेत आहेत. परीक्षेचा काळ जसा तणावाचा तसाच निकालाची वेळी काळजाचे ठोके चुकवणारी असते. हल्ली उच्च शिक्षणासाठी तसेच चांगल्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी दहावी बारावीच्या परीक्षेसोबत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांच्या गुणांवर विद्यार्थ्यांचे भवितव्य निश्चित होत असल्याने परीक्षेचा निकाल हा फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर तो पालकांनाही अस्वस्थ करणारा विषय बनला आहे. प्रत्येक सुजाण पालकाला आपल्या मुलांचे चांगले व्हावे असेच वाटत असते. मुलांनी शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी होत उच्च श्रेणी पटकवावी, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेऊन डॉक्टर, इंजिनीयर बनावे, अशी बहुतांश पालकांची मनोकामना असते. त्याची ही अपेक्षा अगदी रास्त आहे. परंतु, काही पालक मुलांना आपल्या स्वप्नपूर्तीचे "साधन" समजतात. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलांवर दबाव आणल्या जातो, पाल्याच्या टक्केवारीला प्रतिष्टेचा मुद्दा बनवून त्याची इतरांशी तुलना केल्या जाते. अशात

काँग्रेस आतातरी बोध घेणार का?

Image
काँग्रेस आतातरी बोध घेणार का?  सतराव्या लोकसभेचे निकाल लागलेले आहेत.  राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पुन्हा साफ अपयशी ठरली आहे. २०१४ प्रमाणेच या वेळी ही काँग्रेस नुसती हरली नाही तर तिचे पानिपत झाले. विरोधी पक्षनेता पद मिळविण्यासाठी आवश्यक असलेले ५५ खासदारही काँग्रेसला निवडणून आणता आले नाही. मध्यंतरी झालेल्या लढतीत काँग्रेसने भाजपच्या ताब्यातील तीन राज्य जिंकले होते. त्याठिकाणीही बहुमत कायम राखण्यास काँग्रेसला अपयश आले. तब्ब्ल १९ राज्यांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या पक्षसंघटनेची वाताहत झालेली आहे. काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधींचा आक्रमक प्रचार, प्रियांका गांधींची साथ, राफेल प्रकरणापासून बेरोजगारी, शेतकऱ्यांचा असोंतोष असा अनेक मुद्यांचा दारुगोळा सोबत असतानाही काँग्रेसची जी वाताहत झाली ती चिंतनीय आहे. या पराभवाचं विश्लेषण काँग्रेस नेतृत्वाने अगदी खोलवर जाऊन केलं पाहिजे. आपली कुठे, कशी चूक झाली, त्याचा धडा यातून घेतला पाहिजे. काँग्रेससाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी एककल्ली पद्धतीने चालविलेला मोदी विरोधातील अपप्रचा

अपयशातून यशाची प्रेरणा घ्या

अपयशातून यशाची प्रेरणा घ्या दहावी बारावीच्या निकालाचे दिवस जसजसे जवळ येऊ लागेल आहेत तसतशीविद्यार्थी-पालकांची उत्सुकता वाढू लागली आहे. पुढील उच्च शिक्षणासाठी तसेच चांगल्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी दहावी बारावीच्यापरीक्षेसोबत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांच्या गुणांवरविद्यार्थ्यांचे भवितव्य निश्चित होत असते. त्यामुळे परीक्षेचा निकाल हाफक्त विद्यार्थ्यांसाठीच चिंतेचा विषय आहे असे नाही तर तो पालकांनाही अस्वस्थ करणारा विषय बनला आहे. प्रत्येक सुजाण पालकाला आपल्या मुलांचे चांगले व्हावे असेच वाटत असते. मुलांनी शैक्षणिकक्षेत्रात यशस्वी होतउच्च श्रेणी पटकवावी, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेऊन डॉक्टर, इंजिनीयर बनावे, अशी बहुतांश पालकांची मनोकामना असते. त्याची हि अपेक्षा अगदी रास्त आहे. परंतु काही पालक मुलांना आपल्या स्वप्नपूर्तीचे "साधन" समजतात. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलांवर दबाव आणल्या जातो, पाल्याच्या टक्केवारीला प्रतिष्टेचा मुद्दा बनवून त्याची इतरांशी तुलनाकेल्या जाते. अशात विध्यार्थ्याला एखाद्या परीक्षेत अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही तर संपूर्ण दोष त