Posts

Showing posts from April, 2020

बेभान झुंडींचे बळी

Image
बेभान झुंडींचे बळी     आधुनिक शिक्षण, मिळालेले ज्ञान आणि आत्मसात केलेल्या बुद्धीच्या जोरावर आजचा माणूस प्रगत आणि संवेदनशील झाला असल्याचे समजले जात असले तरी, या पृथ्वीतलावर असणाऱ्या इतरांप्रमाणे माणूस हा सुद्धा एक प्राणीच असल्याने त्याच्यातील उपजत प्राणी गुणधर्म अद्यापही नष्ट झाले नसल्याचे सभोवताली घडणाऱ्या घटनांवरून समोर येत आहे. माणूस हा तसा समाजशील. पण, प्राण्यांच्या कळपाची प्रवृत्ती माणसातही तितकीच ठासून भरलेली आहे. या प्रवृत्तीला पोषक एकादा प्रसंग समोर आला की माणसातील सुशिक्षितपणा आणि सामाजिकता अलगदपणे गळून पडते. व त्याची मूळ रानटी वृत्ती ज्वालामुखीसारखी उफाळून येते.आणि बेफाम झालेला माणसाचा हा झुंड मग हिंसेचा कडेलोट करतो. पालघर जिल्ह्यातील कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ जमावाकडून घडलेल्या  अमानुष हत्याकांडातही अशाच हिंस्त्र 'कळपप्रवृत्तीचे' प्रत्यंतर आले.  चोर-दरोडेखोरांच्या अफवेमुळे बेभान झालेल्या जमावाने चोर समजून दोन साधू आणि वाहन चालकाची निर्घृणपणे हत्या केली. कळपाच्या किंव्हा झुंडीच्या वृत्तीला ना विवेक असतो ना विचार. त्यांना ढोबळ गोष्टी तेवढ्या समजतात

कोरोना 'चक्रव्यूह'

Image
कोरोना 'चक्रव्यूह' कुरुक्षेत्रावर द्रोणाचार्यांनी रचलेल्या चक्रव्यूहात अर्जुनपुत्र अभिमन्यू जसा असाह्य झाला होता, तीच हतबलता आज आपणही अनुभवतो आहोत. अभिमन्यूला कौरवांनी गरडा घातला होता, आपल्याभोवती कोरोनाचा विळखा आवळला जातोय. फरक इतकाच की, अभिमन्युला चक्रव्यूह भेद करण्याचं तंत्र अवगत नव्हतं त्यामुळे तो ते छेदून बाहेर पडू शकला नाही. आपल्याला ते ज्ञात आहे. परंतु, ते तंत्र वापरण्यास लागणारं 'संयमा'स्त्र काहीसं बोथट झाल्याने आपली शिकस्त होतांना दिसतेय. कोरोना संसर्गाचा पाडाव करण्यासाठी सरकार, प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस दल, मिडीया, सुरक्षा कर्मचारी जीवाची पर्वा न करता आघाडीवर लढा देत आहेत.. अर्थव्यवस्थेला लाखो-करोडो रुपयांचा फटका बसणार असल्याचे माहीत असूनही पंतप्रधानांनी काल लॉकडाऊन - 2 ची घोषणा केली. कारण युद्धात आर्थिक नुकसानापेक्षा नागरिकांच्या जीवाची किंमत अधिक असते, याची त्यांना जाण आहे. परंतु, काही नागरिकांना मात्र या युद्धाची गंभीरता अजूनही लक्षात आलेली दिसत नाही! त्याचमुळे तर ते अत्यंत किरकोळ गोष्टीसाठी नियम उल्लंघन करून कोरोना नावाचा राक्षस आपल्या घरात आणत आहेत,

लावूया जाणिवांचे दिवे !

Image
लावूया जाणिवांचे दिवे ! आपत्तीच्या काळात सर्वाधिक गरज असते ती विवेक जागृत ठेवण्याची. मात्र कोरोनाच्या या महाभयानक संकटात त्याचाच विसर पडला की काय? अशी शंका येऊ लागली आहे. देशात कोरोनाच्या संसर्गाच्या व्याप्तीचा आकडा दिवसागणिक वाढू लागल्याने त्याविरोधातील लढाई देखील आता महत्त्वाच्या आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. अशा स्थितीत सरकार तसेच नागरिकांच्या जबाबदारीच्या 'जाणिवे'त शतपटीने वाढ व्हायला हवी. परंतु, सारासार विवेक आणि विचार बाजूला ठेवून वर्तन करण्याची जणू काही स्पर्धा सुरु झाली आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला एका व्हिडिओच्या माध्यमातून संबोधित करतांना जनतेला 'दिवे' लावण्याचे आहवान केले आहे. माणसाला जगण्यासाठी सदैव सकारात्मक विचारांची ऊर्जा लागते. कोरोना विरोधात आपण एकाच उद्देशाने लढतो आहोत, ही सामूहिक सकारात्मकता निर्माण करणे हाच या  दीपप्रज्वलनाचा हेतू असल्याने त्याचे स्वागत करायला हरकत नाही. मात्र केवळ दिवे लावून कोरोनासारख्या संकटाचा नायनाट करता येत नाही, तर त्यासाठी व्यापक जबाबदारीची जाणीव ठेवून प्रयत्नांची साखळी तयार करावी लागते. महत्वाचे म्हणजे,

धोक्याची घंटा!

Image
धोक्याची घंटा! कोरोना व्हायरस नावाचा विषाणू सैतान आज जगात धुमाकूळ घालतो आहे.. भारतातील स्थिती  अद्याप नियंत्रणात असली तरी, दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या संशयितांचे आकडे धोक्याचा इशारा देणारे आहेत. त्यामुळे आता आपल्याला नुसती काळजी घेऊन चालणार नाही; तर या संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येक क्षणी दक्ष असावं लागणार आहे. कोरोनाचा संसर्ग आपल्या देशात सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यानंतरच्या सामूहिक संसर्गाच्या टप्प्यात जर आपण जाऊन पोहचलो तर रुग्णांची संख्या गुणाकाराच्या स्वरूपात वाढण्याचा धोका आहे. त्याच्यामुळे संसर्गाची ही शृंखला खंडित करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र काहींना अजूनही यातलं गांभीर्य लक्षात आल्याचे दिसत नाही. विनाकारण रस्त्यावर फिरणारयांची संख्या कमी झाली असली तरी ती पूर्णपणे थांबलेली नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी अजूनही लोक गर्दी करत आहेत. शहराकडून खेड्याकडे जाणारे कामगारांचे लोंढे अजूनही थांबलेले नाहीत. देशभरातील लॉकडाऊन प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी सर्व यंत्रणा झटत असतानाच दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातून ‘मर