Posts

Showing posts from December, 2020

होय मनाशी संवाद..!

Image
ज्या आनंदवनाने अनेकांना नवसंजीवनी दिली, लाखोंना जगण्याची नवी प्रेरणा दिली त्याच आनंदवनात डॉ. शीतल आमटे यांनीे नैराश्यातून आत्महत्या करावी, हे मोठं धक्कादायक आहे.. ज्या हातानी अनेकांना व्याधीमुक्त करून  त्यांना जगण्याची उमेद द्यावी.. त्याचं हातानी विषाचं इंजेक्शन भरावं.. तेही स्वतःला संपवण्यासाठी! या घटनेकडे कुठल्या नजरेने बघावे, हा व्यथित करणारा प्रश्न आहे. विकास व भारती आमटे यांच्या कन्या असलेल्या डॉ. शीतल यांना कर्मयोगी बाबा आमटे यांच्याकडून समाजसेवेचे बाळकडू मिळाले होते. बाबांनी सात दशकांपूर्वी सुरू केलेल्या आनंदवनाच्या सेवा कार्यात डॉ. शीतलही समरस झालेल्या होत्या.  समाजसेवेचा अत्युच्च आदर्श म्हणून बघितल्या जाणाऱ्या आनंदवनाच्या त्या सिईओ होत्या. अपंगत्व विशेषज्ज्ञ त्यासोबतच 'यंग ग्लोबल लीडर' म्हणून सुपरिचित असलेल्या डॉ. शीतल आमटे- करजगी यांनी तणावातून किंव्हा नैराश्यातून आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलावे, ही बाब नुसती दुःखद नाही तर चिंताजनकही आहे. आपसी तान-तनाव आणि निराशेचा सापळा आपल्या आयुष्याला कसा वेढा घालतोय, याची प्रचिती या दुःखद घटनेतून येऊ शकेल! ज्यांच्या कार्यकर्तृत