Posts

Showing posts from July, 2019

नवा गडी नवा डाव !

नवा गडी नवा डाव ! विधानसभा निवडणुकांचे पडघम जोरदार वाजायला लागले आहेत. आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली असून त्यादृष्टीने पक्षसंघटनेत खांदेपालट आणि फेररचना करण्यास सुरवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्‍क्‍यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॉंग्रेसने संगमनेरचे आमदार तथा राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या खाद्यांवर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी दिली असून पाच कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती करत पक्षसंघटनेत फेररचना केली आहे. दुसरीकडे सत्ताधारी भारतीय जनता पक्षातही प्रदेश नेतृत्वाची खांदेपालट करण्यात आली असून राज्याचे विद्यमान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाचा कारभार सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. तर आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लागल्याने तसेच मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचा राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने त्यांच्याकडील पक्षीय पदांची जबाब