Popular posts from this blog
ऐसे कैसे झाले भोंदू?
अनंत वाचाळ बरळती बरळ!
अनंत वाचाळ बरळती बरळ! राज्यघटनेने सर्व भारतीयांना मूलभूत हाक्काद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहे. मात्र या स्वातंत्र्याचा गैरवापर करून द्वेषमूलक विधाने करणाऱ्या उठवळ नेत्यांची संख्या गेल्या काही दिवसापासून वाढते आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे सामाजिक नीतिनियम, सामाजिक आदर, परंपरा, नीतिमूल्यांची निर्लज्जपणे होळी करणे नव्हे, हे या बेलगाम वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांच्या लक्षातच येत नाही. पक्षाच्या किंव्हा सत्तेच्या एकाद्या पदाची माळ गळ्यात पडली कि ही मंडळी बोंबा ठोकायला मोकळी होतात. काहीवेळा पक्षही अश्या वाचाळवीरांना आवर घालण्याऐवजी त्यांचे समर्थन करतो. त्यामुळे यांची हिम्मत अजूनच वाढते आणि त्यांच्या सुटलेल्या जिभा सभ्यतेच्या सर्व मर्यादा पार करून जातात. आपण काय बोलतोयं, त्याचा समाजमनावर काय परिणाम होईल, याची या बोलभांडाना किंचितही तमा राहत नाही. ' उचलली जीभ कि लावली टाळूला' या उक्तीनुसार हातात माईक पडला कि ही मंडळी बेफाम सुटतात. मग, त्यांचे बोलणे 'बरळणे' कधी होते..ते त्यांच्या स्वतःच्याही लक्षात येत नाही. चंद्रपूरचे खासदार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहि...
Comments
Post a Comment