तुम मे से कोई 'राम' है क्या..???
तुम मे से कोई 'राम' है क्या..???









*
सण आणि उत्सवांची नाळ भारतीय समाजमानाशी अत्यंत घट्ट जोडलेली आहे. भारतीय संस्कृतीची उज्ज्वल परंपरा टिकवून ठेवणे हा सण साजरे करण्यामागील उद्देश असला तरी, या प्रत्येक सणामागे काहीतरी अर्थ दडलेला आहे. प्रत्येक सणाचं आयोजन मोठ्या उदात्त हेतूने करण्यात आलं आहे. केवळ वेळ मजेत जावा, चार घटका मनोरंजन व्हावं हा यामागचा उद्देश नाही तर या उत्सवांतुन एक सामाजिक संदेश देण्यात आला आहे. म्हणून तर गणेश उत्सव आला की सामाजिक भावना जागृत होते. नवरात्राला सुरवात झाली कि स्त्रीशक्तीचं महत्व पटू लागतं, तर दिवाळी आली की अंधाराचा सामना करूण त्याला भेदणार्या दिव्याची महंती पटते. असाच एक मोठा सण म्हणजे ‘दसरा’ वर्षातील साडे तीन मुहूर्तांपैकी एक मोठा मुहूर्त म्हणून याची ओळख आहे. ‘असत्यावर सत्याचा’, ‘दृष्टावर सुष्टाचा’ विजय या संकल्पनेतून हा सण साजरा केला जातो आणि म्हणूनच याला विजयादशीमी असेही म्हणतात. अज्ञानावर ज्ञानाने, वैर्यावर प्रेमाने विजय मिळवायचा.. यश, किर्ती प्राप्त करायची, धनसंपदा लुटायची आणि लुटवायचा हा दिवस.. मात्र बदलत्या काळानुसार उत्सवात उत्साहाचाच अतिरेक होऊन संस्काररहित कृत्यांचच प्रदर्शन होऊ लागलं आहे. त्यामुळे या सणाचं सांगणं काय आहे? हे समजावून घेऊन सण साजरे करण्याची गरज आहे.*
_पुराणामध्ये या सणांचे माहात्म्य सांगितले आहे. त्याचबरोबर ऐतिहासीक काळातही या दिवसाचे अनेक महत्वाचे संदर्भ सापडतात. परमेश्वराने अष्टभुजा देवीचं रूप घेवून महिषासुर आसुराशी युध्द केले. दशमीला देवीने महिषासुराचा वध केला. म्हणून दसर्याला विजयादशीमी म्हणतात. विराट राजाचे दास बनून पांडव एक वर्ष अज्ञातवासात गेले. त्यांनी आपले शस्त्र जंगलातील शमीच्या झाडाध्ये लपवून ठेवली होती. अज्ञातवास संपल्यानंतर पांडवांनी सर्व शस्त्र शमीच्या झाडावरून काढून घेतली. झाडांची आणि शस्त्राची पुजा केली तो दिवस ही दसर्याचाच होता. प्रभु रामचंद्रानीही याच दिवशी लंकेचे सीमोल्लंघन करून रावणाचा वध केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच दिवशी अनेक वेळा मोहिमेची सुरूवात केलेली आहे. दसरा हा खास क्षत्रियांचा सन म्हणूनही ओळखला जातो. साम्राज्य विस्तारासाठी राजे याच दिवशी स्वारीवर निघत असत. त्याच गतस्मृतींना उजाळा देण्यासाठी आजही शस्त्रपुजा, सरस्वती आणि लक्ष्मीची पुजा करण्याची प्रथा आहे._
_या दिवशी लहान व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या व्यक्तीला ‘सोने’ देवून नम्रपणे नमस्कार करतात हे वरवरचे देणेघेणे नाही तर यामागेही एक परंपरा आहे. वयस्कर व्यक्तींनी घरी राहून घर सांभाळावे आणि लहानव्यक्तींनी घराबाहेर पडून सोने म्हणजेच उत्पन्न मिळवावे व ते विनम्रपणे थोरांच्या चरणी अर्पण करावे. आणि थोरांनीही त्याचा स्विकार करुन उदार अंतकरणाने आशिर्वाद द्यावा.. असा याचा मतितार्थ असावा. या दिवशी आपट्याच्या पानांनाही वेगळेच महत्व आहे. सोने म्हणून ते एकमेकांना दिले जातात यामागेही रंजक अशी कथा आहे. पांडवांचा अज्ञातवास संपल्यानंतर आपट्यांची पाने वाटून त्यांनी आंनदोत्सव साजरा केला होता. त्याचेच प्रतिक म्हणून या पानांना सोन्याची उपमा दिली जाते. दसर्याच्या दिवशी विजयाचे सीमोल्लंघन करण्याचा प्राचिन काळापासून प्रघात आहे. मात्र बदलत्या काळानुसार व जिवनशैलीत आमूलाग्र बदल झाल्याुळे सण साजरे करण्याच्या पद्धतीध्येही बदल झाले आहेत. काळाचे बदलते संदर्भ लक्षात घेता आपणही आजचे सीमोल्लंघन काळानूरुप करायला हवे. आज माणसाचे जिवन अत्यंत धकाधकीचे आणि ताणतणावाचे झाले आहे. अशा परिस्थीतीत मनाला उदासिनता येणे सहाजिकच आहे. या उदासिनतेचे नव्या आशावादाकडे सीमोल्लंघन करण्याचा निर्धार प्रत्येकाने करायला हवा परंतु, हे सीमोल्लंघन केवळ व्यक्तीगत पातळीवर असू नये तर ते सामाजिक पातळीवरही होण्याची गरज आहे._
_प्रभु रामचंद्राने रावणाचा वध केला याचे प्रतिक म्हणून गावागावात रावणाचे दहन केले जाते. मात्र आपल्या मनातील रावणाचे दहन केले आहे का? याचे आत्मचिंतन यानिमित्ताने व्हायला हवे. ' मैने महसूस किया है। उस जलते हुए रावणका दु।ख, जो सामने खडी भिडसे बारबार पुछँ रहा था...’’ तुम मे से कोई राम है क्या? ’ सोशल मीडियावर फिरणारा हा संदेश खरोखरच आजच्या परिस्थीतीवर अंतर्मुख व्हायला लावतो. भौतिक सुखसोईंनी समृद्ध झाल्याने आपण उत्सव मोठ्या थाटााटात साजरा करतो. परंतु त्यातील संदेश आपण समजून घेतला आहे का? याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. आज समाजातील सहीष्णता कमी होत आहे. माणसाच्या संवदेना बोथट झाल्याची अनेक उदाहरणे आपण दररोज ऐकतो, बघतो. स्त्री भ्रूण हत्या, महिला, मुलींवरील अत्याचार, शेतकरी आत्महत्या अशा अनेक समाजमनाला अस्वस्थ करणार्या घटना झपाट्याने वाढत आहे. याकडे त्रयस्थपणे बघण्याची भूमिकाच अनेकांची असते. प्रभु रामचंद्राने स्त्रिशक्तीच्या रक्षणासाठी बलाढ्य रावणाचा वध केला होता. त्यातील स्त्रिरक्षणाचा संदेश आपल्याला कितपत उमगला याचं आत्मचिंतन प्रत्येकाने केले पाहिजे. दसरा हा सण केवळ विजयोत्सव साजरा करण्याचे प्रतिक नाही तर सबलांनी दुर्बलांचे रक्षण करावे असा संदेशही हा सण देतो. म्हणूनच ज्या प्रमाणे प्रभु रामचंद्रानी रावणाचा, देवीने महिषासुराचा वध केला त्याच प्रमाणे आपण आपल्यामधील काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांचा वध करुन या षडीरीपूवर विजय मिळवावा व त्रयस्थपणाचेे सिोंल्लघन करुन सामाजिक जाण-भान जपण्याचा निर्धार करावा_.

Comments
Post a Comment