Posts

काँग्रेसचे ऱ्हासपर्व संपेल काय?

Image
काँग्रेसचे ऱ्हासपर्व संपेल काय? लोकसभेचे निकाल लागल्यापासून काँग्रेस पक्ष सैरभैर झालाय. देशाच्या राजकारणात प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका निभावण्याची जबाबदारी असतांना काँग्रेसचे अंतर्गत प्रश्नचं अजून सुटायला तयार नाहीत. राष्ट्रीय नेतृत्वावरून पक्षात अस्वस्थतेचे वातावरण आहे. प्रादेशिक नेत्यांमधील मतभेद विकोपाला पोहचले आहे. एकमेकांतील समनव्याअभावी नियोजनाच्या पातळीवरही काँग्रेस पिछडीवरच आहे. त्यामुळे काँग्रेसची राज्यातील सरकारे अस्थिर होत आहेत. सुरुवातीला कर्नाटकची सत्ता गेली. बहुमत असताना मध्य प्रदेशातील सत्ता गेली आणि संख्याबळाच्या बाबतीत अत्यंत समाधानकारक स्थिती असताना राजस्थानही हातातून जाण्याची स्थिती निर्माण झाली. गोवा, मणिपूरसारख्या राज्यात भाजपपेक्षा जादा जागा येऊनही कॉंग्रेसला सरकार स्थापन करता आले नाही.  एकीकडे नेते नाराज आहेत..दुसरीकडे कार्यकर्ते नाउमेद होत आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केलेल्या व स्वातंत्र्यानंतर प्रदीर्घ काळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेसची आज अशी अवस्था का व्हावी? हा खरं तर चिंतनाचा मुद्दा. परंतु, यावर बोलण्याऐवजी काँग्रेसनेते आपसातील हेवेदेवें ...

पक्षपाती 'फेस' बुक !

Image
संवाद-संपर्कक्रांती घडवून आणणा-या सोशल मीडियाने आज जगभरातील बहुतांश नागरिकांचे जीवन व्यापून टाकले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, सर्वात वेगवान प्रसिद्धी, दिलखुलास अभिव्यक्त होण्याचं व्यासपीठ, आशा कितीही गोंडस संज्ञा या तंत्रज्ञानाला चिटकवण्यात येत असल्या तरी सोशल मीडियाचं हे जग जितकं आभासी तितकंच असत्याच्या धाग्यांनी विणलेलं असल्याचं वास्तव अनेकदा समोर आलं आहे. सर्वाधिक लोकप्रिय समजल्या जाणाऱ्या फेसबुक वरून मध्यंतरी पाच कोटी यूजर्सचा डाटा लिक झाल्याची बाब उघड झाली होती. फेसबुकच्या ग्राहकांची खासगी माहिती चोरून ब्रिटनमधील केंब्रिज अॅनालिटिका या डेटा कंपनीने त्याचा वापर ट्रम्प यांना अध्यक्षीय निवडणुका जिंकण्यात व ब्रिटनचे ‘ब्रेक्झिट’च्या बाजूने मत वळवण्यात केला असल्याच्या खुलाशाने समाजमाध्यमांचा अविश्वासाचा 'फेस' उघड झाला होता. आता, अमेरिकेचे वृत्तपत्र द वॉल स्ट्रीट जर्नलने फेसबुकची धंद्यासाठी राजकिय लागेबंधे जपणारी पक्षपाती नीती उघड करून धंदेवाईक काळा चेहरा समोर आणला आहे. त्यामुळे,  सोशल मीडियावरील नियम-अटी, आचार-विचार निष्पक्ष आणि सत्य असल्याच्या समजुतीवरच घाला घातला गेला ...

सारे वाद श्रीरामार्पण!

Image
सारे वाद श्रीरामार्पण! जगभरातील असंख्य रामभक्त ज्या ऐतिहासिक क्षणाची गेल्या कित्येक वर्षांपासून आतुरतेने प्रतीक्षा करीत होते ती सुवर्ण सकाळ अखेर काल उजाडली. अनेक दशकांपासून बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ठरलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजन सोहळा अद्भूत आणि भावोत्कट वातावरणात रामजन्मभूमीत पार पडला.  बुधवारी  दुपारी 12 वाजून 44 मिनिटे 8 सेकंद या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिराची प्रथम रजतशीला  स्थापन करून मंदिरनिर्माण कार्याचा प्रारंभ केला.  आणि 5 ऑगस्ट, हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिल्या गेला. खरंतर, या मंगल सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची जगभरातल्या लाखो - करोडो रामभक्तांची अनिवार इच्छा होती. परंतु कोरोना संक्रमणाच्या धोक्यामुळे मोजक्या गणमान्य व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दूरचित्रवाणी संचांच्या  माध्यमातून का होईना आपल्याला या क्षणाचे “याची देही याची डोळा’ साक्षीदार होता आले, हेही आपलं भाग्यचं म्हटलं पाहिजे. शरयू नदीच्या तीरावर वसलेल्या अयोध्येत जेथे प्रभू श्रीरामाचा जन्...

नव्या युगाची चाहूल!

Image
नव्या युगाची चाहूल! आधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आजचे युग स्पर्धेचे युग म्हणून ओळखले जावू लागले आहे. या स्पर्धेच्या युगात तग धरण्यासाठी पारंपारीक शिक्षण पद्धत सक्षम नाही! ही बाब प्रकर्षाने अधोरेखित होत असताना केंद्र सरकारने बहुप्रतीक्षित राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी देऊन भारतीय शिक्षणव्यवस्थेला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या स्पर्धेत निभाव लागायचा असेल, तर एकतर त्यातून माघार घेणे किंवा नवे बदल आत्मसात करत स्वत:ला सक्षम करणे हेच पर्याय आपल्यासमोर उपलब्ध होते. त्यातील बदल स्वीकारण्याचा पर्याय सरकारने निवडला यासाठी केंद्र सरकार अभिनंदनास पात्र आहे. “बच्चा, कामयाब नहीं काबिल बनो, कामयाबी अपनेआप कदम चूमती है!” थ्री इडियट्स मधील बाबा रणछोडदासच्या या लोकप्रिय संवादानुसार दहावी-बारावीच्या परिक्षातील गुण मिळवण्याची रेस कमी करण्यास प्राधान्य देऊन घोकंपट्टी छाप 'रट्टा' मार  शिक्षणाऐवजी कौशल्य विकास आणि संशोधनावर भर देणारी.. तसेच  उच्च शिक्षणातील शाखानिहाय कप्पेबंदपणा दूर करुन विद्यार्थ्यांना आवडत्या विषयात करिअर करण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध करून देणारे ह...

आता आव्हान पुढील शिक्षणाचे!

Image
आता आव्हान पुढील शिक्षणाचे! कोरोना संक्रमणाच्या साथीमुळे निर्माण झालेल्या अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत आधी बारावी आणि आता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणून गणल्या जाणाऱ्या या दोन्ही परीक्षाच्या निकालाने यंदा विक्रमी झेप घेतली आहे. उत्तीर्णांच्या टक्केवारीचा चढता आलेख आणि स्वप्नवत वाटणार्‍या 90 टक्क्यांचा टप्पा गाठणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या, हे या वर्षीच्या निकालाचे ठळक वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. ऐन परीक्षेच्या काळात यावेळी कोरोनाचे संकट उभे राहिले होते. त्यामुळे दहावीचा भूगोलचा पेपरही रद्द करावा लागला. सर्वत्र निराशा आणि मानसिक दबावाचे वातावरण असतानाही दहावीच्या निकालाने घेतलेली 95.30 टक्क्यांची भरारी म्हणजे महामारीच्या काळछायेतला हा एक झगझगीत पैलू म्हणायला हवा. अर्थात,  विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्‍स मिळवले, निकालाची टक्‍केवारीही गतवर्षीपेक्षा चांगली आहे; पण या निकालाचा निखळ आनंद घेण्याची परिस्थिती सध्या नाही. वाढलेल्या टक्केवारीने पुढील शिक्षणाचे नवे प्रश्न निर्माण केले आहेत. एरवी सर्व काही स...

बोध कधी घेणार?

Image
तहान लागल्यावर विहीर खोदु नये, अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. भविष्यात येणाऱ्या संभाव्य संकटांचा अंदाज बांधून त्यावर अगोदरच तजवीज करावी असा या वाक्याचा मतितार्थ.. पण, संकट अंगावर आल्याशिवाय त्यावर विचारचं करायचा नाही, अशी काहींची भूमिका असते! अर्थात, या भूमिकेची जबर किंमतही त्यांना चुकती करावी लागते. परंतु, एकदा नव्हे तर अनेकदा चटका बसल्यावरही बोध घेतला जात नसेल तर होणाऱ्या दुष्परिणामासाठी इतरांना दोष देण्यात अर्थ उरत नाही.   राजस्थानात काँग्रेस आज ज्या काही पेचात पडली आहे त्याचं एक मुख्य कारण वेळीच दखल न घेणे हेदेखील आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडखोरीमुळे कमलनाथ सरकार पडल्यानंतर 'ज्योतिरादित्य शिंदे तो झांकी है सचिन पायलट अभी बाकी है' आशा घोषणा सोशल मीडियावर बुलंद झाल्या होत्या. सचिन पायलट यांच्या नाराजीच्या बातम्या कधीपासून येत आहेत. पायलट सारख्या नेत्याच्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालण्यासाठी अनेक घटक अमिशांची पोतडी घेऊन तयार होते. जे मध्यप्रदेशात घडलं त्याची पुनरावृत्ती राजस्थानातही होऊ शकते! असे इशारे काय कमी दिले गेले होते? पण, काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वा...

वाढीव वीजबिलांचा “शॉक’

Image
नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी  सरकार तसेच सरकारच्या अखत्याऱ्यातील विविध यंत्रणा, संस्था, मंडळे, कंपन्या काम करत असतात. 'रास्त' दरात आवश्यक सेवा उपलब्ध करून देणे, हा त्यामागचा उद्देश असतो. मात्र, या यंत्रणाद्वारे खरेच उद्दिष्टपूर्ती केल्या जातेय का? हा प्रश्न नेहमीचा आहे. सध्याच्या कोरोना संकटकाळात तर त्याची दाहकता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. कोरोना संक्रमणाच्या भीतीने संपूर्ण देशात टाळे बंदी लागू केली असताना केंद्र सरकारने इंधनावर अतिरिक्त करवाढ केली. परिणामी आज पेट्रोल लिटर मागे साडे आठ रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी महाग झाले आहे. इंधन दरवाढीचा हा झटका अपुरा होता म्हणून की काय, वीज वितरण कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना सरासरी वीजबिलाच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा वीज बिलं पाठवून मोठा शॉक दिलाय. कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वीज कंपन्यांकडून मीटर रिडींग न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये तीन महिन्यांच्या वीजबिलाची सरासरी काढून वीज कंपन्यांनी ग्राहकांना वीजबिल पाठवली. मात्र अनेकांना काही हजारांच्या घरात विजेची बिलं आलेली आहेत. सरासरी आणि अति...