वादाला नाहक 'उत'!



शब्द संभाल के बोलिये, शब्द के हाँथ न पाँव रे.. एक शब्द औषध करे, एक शब्द करे घाव रे..!' शब्दांचं माहात्म्य वर्णन करण्यासाठी ह्या ओळी अंत्यत चपलख म्हटल्या पाहिजेत. आपण शब्द मृदू वापरतो की कठोर, यावरून तो शब्द औषधीचे काम करतो की घावाचे, हे ठरत असते. शस्त्राने केलेली जखम लवकर भरून येते, पण शब्दाने केलेली जखम भरून येण्यास दीर्घ कालावधी लागतो किंबहुना ती अनेकदा भरूनही येत नाही, त्यामुळे शब्दांचा वापर जपून केला पाहिजे. हे उपदेश आता वाचून-एकूण, घासून-घासून गुळगुळीत झालेत. पण तरीही बोलतांना तारतम्य ठेवण्याचे भान मोठं-मोठ्यांना राहत नाही. राजकारण्यांमध्ये तर बेताल बोलण्याचा जसा काही साथीचा रोग आल्यासारखी परिस्थती आहे. हा रोग कोण्या एका पक्षापुरता मर्यादित राहिला नाही तर सर्वच पक्षांमध्ये याची लागण झालेली दिसून येते. प्रसिद्धी मिळविण्याचा, (मग ती कशी का असोना)  तो राजमार्ग ठरत असल्याचे समोर येत असल्याने कदाचित बोलतांना राजकारणी लोकांचा तोल जात असावा..! किंव्हा ठरवून एकाद्या विषयाला फोडणी दिल्या जात असावी !! कारण काहीही असो, पण विषय सोडून बोलणाऱ्यांची संख्या राजकारणात दिवसोंदिवस वाढू लागली आहे. अडगळीत पडलेल्या एकाद्या नेत्याने प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी हा प्रकार केला तर एकवेळ समजून घेता येईल. पण, राजकारणात ज्यांना चाणक्याची उपमा दिल्या जाते.. जे प्रसिद्धीच्या मोठ्या शिखरावर जाऊन बसलेले आहेत त्यांनीही नाहकचे विषय का उकरून काढावेत ? हे न सुटणारे कोढ आहे. 


खा. संजय राऊत, या नावाचा महाराष्ट्राच्या राजकारणात आज इतका टीआरपी आहे कि कि त्यांच्या प्रत्येक शब्दाची बातमी होते. कुणाच्या ध्यानीमनीही नसताना खा. राऊत यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असल्याची गर्जना ठोकली.. नुसता दावा केला नाही शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांनी आपल्या  मुत्सद्दीपणाचा कस लावला. राज्यात राजकीय परिवर्तन घडवून महाविकास आघाडीचं नवीन  समीकरण निर्माण करण्यात खा. राऊत यांचा सिंहाचा वाट राहिला, असं म्हटल्यास अतिशियोक्ती ठरणार नाही. मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर काल एका कार्यक्रमात त्यांनी केलेली वक्तव्य त्यांच्या एकंदर भूमिकेशी विसंगत वाटावी अशीच आहेत. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी गुंड करीम लाला याना भेटायला येत असत, असं वक्तव्य करून खा. संजय राऊत यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्टेपनी म्हणणे, आणि  उदयनराजे यांच्याकडे छत्रपती घराण्यातील असल्याचे पुरावे मागून त्यांना काय साध्य करायचे आहे ? हे लक्षात येत नाही. भारतरत्न इंदिरा गांधी काँग्रेस पक्षासाठी वंदनीय आहेत..त्यांच्या नेतृत्व आणि कर्तृत्वावर देशालाही अभिमान आहे. शिवसेनेनेही श्रीमती गांधी यांच्या कार्याला अनेकदा गौरविले आहे. त्यामुळे काहीही कारण नसताना इंदिरा गांधी यांच्याबाबत वक्तव्य करण्याचा हेतू काय? अर्थात, काँग्रेसच्या नाराजीनंतर खा. राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र या वादाला फोडणी का दिल्या गेली असावी? हे न समजण्यापलीकडचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केल्यावरून आधीच महाराष्ट्रातील जन्मात प्रक्षुब्ध झाले असताना उदयनराजे याना छत्रपती घराण्यातील असल्याचे पुरावे मागण्याचे वक्तव्यही नाह्कचेचं. खा. संजय राऊत अभ्यासू, चिंतनशील तसेच रोखठोक भूमिका मांडण्यासाठी ओळखले जातात. विषयानुरूप त्यांनी मांडलेल्या भूमिकांचे त्यांच्या सहकारी पक्षांनी वेळोवेळी कौतुक केले आहे. मात्र काहीही विषय नसताना रोख आणि ठोक बोलून मित्रपक्षांना असेच दुखावले गेले तर महाविकास आघीडीत बिघाड होण्याची सुरवात होऊ शकते. 


आपण भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आलो असलो.. एकाद्या विषयावर आपली वेगवेगळी भूमिका असली तरी राज्यासाठी काय हिताचे आहे याचाच विचार आपल्याला प्रामुख्याने करायचा आहे.असा जबाबदारीचा कानमंत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर आपल्या सहकार्यांना दिला होता. यश आणि सत्ता मिळाल्यानंतर भलेभले गांगरून जातात. मात्र मुख्यमंत्र्यांनी सत्तेची सूत्र हाती घेताक्षणीच कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव आपल्या मंत्रिमंडळातील सहकार्यांना करून दिली. त्यांचा हा सुजाणपणा नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र आता हा मंत्र पक्षाच्या प्रत्येक नेत्याला देण्याची गरज अघोरेखित होऊ लागली आहे. राज्याच्याच नाही तर देशाच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देणारा राजकीय प्रयोग महाराष्ट्रात केला गेला. तो यशस्वी करायचा असेल नाहकचे वाद टाळण्याची गरज आहे. तसेही हे सरकार स्थापन होण्यासाठी आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची नेमणूक ते खातेवाटप करण्यात बराच विलंब लागला असून ते जनतेच्या नजरेतून सुटलेले नाही. त्यातच सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून न

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

तुझा विसर न व्हावा !

अनंत वाचाळ बरळती बरळ!