देऊ धैर्याने लढा !
देऊ धैर्याने लढा ! मानवाच्या केसांपेक्षा एक हजार पटींनी लहान असणाऱ्या करोना नामक विषाणूमुळे सध्या आपल्याला घरात बसण्याची वेळ आली आहे. जिकडे तिकडे सगळीकडे या विषाणूचा कहर वाढत चाललाय. आपल्या देशातील स्थिती सध्या नियंत्रणात असली तरी, रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच, चीन, इटली, अमेरिका, स्पेन आदी देशात कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेली स्थिती, तेथील अवस्था, चित्रफिती, मृतांची संख्या याविषयी वेगवेगळ्या स्वरूपाची खरी-खोटी माहिती समाज माध्यमांतून आपल्यापर्यंत पोहोचू लागल्याने कोरोनाविषयी एकप्रकारची जबरी दहशत उत्पन्न झाली आहे.. जगातील भयान परिस्थिती जाणल्यावर कोरोनाचा हल्ला शरीरावर होण्याआधी मनावर आणि आत्मविश्वासावरही होत आहे; मन...काळीज...सगळं सगळं कसं सुन्नं सुन्नं झालं आहे. निश्चितच, संकट मोठं आहे.. परिस्थिती देखील गंभीर आहे. मात्र, ही वेळ नुसती काळजी करण्याची नाही, तर खबरदारी घेण्याची आहे..भीती बाळगण्याची नाही, तर संकटावर स्वार होण्याची आहे. त्यामुळे, आपण कायम आशावादी असायला हवं! निराशावाद आणि नकारात्मक विचारांनी कुठलीच लढाई जिंकता येत नाही, हा इतिहास आहे. आशा...

Comments
Post a Comment