विवेकाचे दिप विझनार नाहीत..!

*_"विचार पटत नसतील तर विरोध करावाच..मात्र विचार मांडण्याची काहीतरी आचारसंहिता असावी. एकाद्याच्या मरणावर आनंद व्यक्त करून असुरी जल्लोष करणाऱ्याना आपली कोणती संस्कृती दाखवायची आहे."_*

👊👊👊👊👊👊👊
*विवेकाचे दिप विझनार नाहीत..!*
👊👊👊👊👊👊👊👊
         *अँड. हरिदास उंबरकर*
                         
👉 _बंदुकीच्या गोळीने विचार संपविता येत नाही, हे सत्य अनेकवेळा अधोरेखित झाले आहे. महात्मा गांधी पासून ते दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येनंतर त्यांचे विचार अधिक प्रखर बनून 'अमर' झाले. मात्र, तरीही विचारांची लढाई विचारांनी करण्यापेक्षा व्यक्तीलाच संपविण्याची भ्याड प्रवृत्ती देशात वाढीस लागत आहे._ २० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, त्याच पद्धातीने कॉम्रेड गोविंदराव पानसरे, एम. एम कलबुर्गी यांच्याही हत्या करण्यात आल्या.आता या यादीत आणखी एक नाव सामील झाले आहे. *सुप्रसिद्ध पत्रकार आणि बंगळुरू येथील “लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांची ही त्याच ‘मोडस ऑपरेंडी’ ने हत्या करण्यात आली. या चारही जणांचे व्यवसाय,विचारसरणी काम करण्याच्या पद्दती वेगवेगळ्या असल्या तरी हे चारही जण सुधारणावादी विचारांचे प्रवाहक होते. समाजातल्या भोळसट, अविवेकी, अज्ञानातून निर्माण झालेल्या धार्मिक कुप्रथांविरुद्ध विवेकवादाची,बुद्धिप्रामाण्यवादाची लढाई त्यांनी सुरु केली होती. त्यामुळे जातीयवादी गटांचे पित्त खवळने सहाजिकच... विचाराला, विचारांनी तोंड देण्याचं कुवत त्यांच्यात उरली नसल्याने बंदुकीचा बेगडी सहारा घेण्यात आला. तसेही, फॅसिझमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज कायमचा बंद करून टाकणे, ही संस्कृती देशात फार पूर्वीपासून रुजवण्यात आली आहेच. ती संस्कृती पुन्हा उफाळून आली आणि प्रागतिक चळवळीतील चार रत्न एकापाठोपाठ एक गळून पडले.*

त्याग, प्रेम आणि विवेकाचा वारसा भारतीय संस्कृतीला लाभला आहे. *एखाद्या स्त्री वर शस्त्र उगारणे दूरच,  रंणागंणातही निःशस्त्रावर वार करू नये, ही शिकवण भारतीय परंपरा  देते. मात्र सद्यस्थितीत मानवतावादाचे संकेतही काही लोकांना बोचू लागले आहेत. एका निःशस्त्र महिलेवर हल्ला करण्याइतपत पातळी या प्रवृत्तीने सोडली असून खुलेआमपणे निरपराधांचे मुडदे पाडले जात आहेत. शत्रूच्या गोटातील स्त्रीलाही सन्मानाची वागणूक देऊन सहीसलामत परत पाठविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या देशात, विचारांना गोळ्या घालून उत्तर देण्याची, एका अबला स्त्रीवर 'वार' करण्याची  ही षंढ प्रवृत्ती कोठून आली, याचा शोध घ्यावा लागेल.* _एखाद्या व्यक्तीचे विचार पटत नसतील तर त्याच्याशी विचारांचा संघर्ष करण्याऐवजी त्या व्यक्तीलाच संपविण्याची प्रवृत्ती संवैधानिक विचार स्वातंत्र्याच्या तत्वाला तर मारक आहेच, शिवाय देशाच्या इभ्रतीसही कलंक लावणारे आहे. चार वर्षात प्रागतिक चळवळीतील चार कार्यकर्त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मात्र, अद्यापही सरकार किंव्हा तपास यंत्रणांना त्याचा छडा लावता आलेला नाही. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि आता गौरी लंकेश यांच्यावर_ *गोळ्या झाडणारे 'हात' कुणाचे होते? हे तपास यंत्रणांना कदाचित माहीत नसेलही, मात्र त्यामागे 'मेंदू' कोणत्या विचार प्रवृत्तीचा आहे, हे सर्वसामान्य जनतेला दिसते. पण ते सरकारला आणि तपास यंत्रणांना का दिसत नाही, हा अस्वस्थ करणारा सवाल आहे.*

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर डाव्या आणि उजव्या विचारांमध्ये सोशल मीडियावर संघर्ष पेटला आहे.. अर्थात, हा 'वैचारिक' पातळीवर असला तर चांगलाच.. परंतु *एकाद्याचा मृत्यू झालाय, मृत्यू नैसर्गिक नाही, त्या व्यक्तीची हत्या करण्यात आलीय. त्यावर आनंदात्मक विचारांची उधळण करणाऱ्या  असंवेदनशीलतेला काय म्हणावं ? आपण उन्मादाच्या भरात द्वेषाची बीजे रोवत असल्याचीही या मंडळींच्या लक्षात येऊ नये का? विचार पटत नसतील तर त्याचा विरोध करायलाच हवा, मात्र विचार मांडण्याची काहीतरी आचारसंहिता असावी. एकाद्याच्या मरणावर आनंद व्यक्त करून असुरी जल्लोष करणाऱ्याना आपली कोणती संस्कृती दाखवायची आहे.* आणि, यामुळे खरंच चळवळ बंद वगैरे पडेल असं तर यांना वाटत नाही ना? तसं असेल तर, इतिहासाची पाने चाळून पहा.. *जेंव्हा जेंव्हा विचार दाबण्याचा पर्यंत झाला आहे, तेंव्हा तेंव्हा तो विचार दुप्पट वेगाने उफाळून वर आला आहे.*

संतपरंपरेत हिंदू कर्मकांडाविरोधात बोलणा-या ज्ञानेश्वरांना वाळीत टाकण्यात आले होते. त्यांना आज *'ज्ञानाचा राजा ज्ञानदेव* म्हणून संभोधल्या जाते. विवेकाला आव्हान देणारे तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणीत बुडवले गेले होते. पण ते बुडले नाहीत, तर शेकडो वर्षांपासून जनसागरावर ते आजही तरंगत आहेत..इतकेच नाही तर *'पाचवा वेद'* म्हणून महाराजांच्या गाथ्याला जगतमान्यता मिळाली. महात्मा गांधींनाही गोळ्या घालून संपविण्याचा प्रयत्न झाला, पण आजही *गांधी विचारांना* जगात तोड सापडलेले नाही. डॉ नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली, त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलनाचा एक इतिहास रचला गेला, आणि सरकारला *अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा* मंजूर करावा लागला. पानसरेंच्या मृत्यूनंतर त्यांचे *'शिवाजी कोण होता'* हे पुस्तक लाखो- करोडोच्या संख्येने विकल्या गेले. तसेच लंकेश यांचेही बलिदान वाया जाणार नाही. पुरोगामी चळवळीतील कार्यकतें, पत्रकार त्यांच्या विचारांचे वाहक बनतील. *बंदुकीच्या गोळीने व्यक्ती मारता येऊ शकेल, मात्र विचार मारणारे शस्त्र अजून उदयास आले नाही.  कारण विचार अभंग असतात.. जगाच्या पाठीवर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ते कायम जिवंत राहतात, हे सत्य काहींना 'कळत' नाही, कळलं तरी 'वळत' नाही.. हे खरं दुर्दैव आहे.*

आपल्या संतांनी चार-पाचशे वर्षांपूर्वी समाजसुधारणेची लढाई सुरु केली होती. संतांनी सुरु केला विवेकवादाचा हा लढा  दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश या लोकांनी  मोठ्या धाडसाने पुढे सूर ठेवला होता. मात्र एकापाठोपाठ एक झालेल्या त्यांच्या हत्यांनी अनेक प्रश्न  उपस्थित केले आहेत. यामुळे निश्चितच पुरोगामी चळवळीला मोठा हादरा बसला. परंतु, या हादऱ्यात धास्तावून जाऊन चालणार नाही.. *हिंसेच्या बदल्यात हिंसा, हत्येच्या बदल्यात हत्या,हा अविचार पसरवू पाहणाऱ्या प्रवुत्तीचा समाचार घेण्यासाठी आपल्यालाही लेखणीरूपी तलवारी सज्ज ठेवाव्या लागतील..आज, माणुसकीचा प्रकाश देणाऱ्या 'पणत्या' बंदुकीच्या गोळी ने फोडण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तीने सुरु केला आहे. मात्र, समाज सुधारकांनी पेटवलेले _' विवेकाचे दिप'_ कदापी ही विझनार नाहीत.. ते कायम तेवत राहतील, व अविवेक आणि धर्मांधतेचा अंधार अविरत दूर करत राहतील..!!*

--
Good Evening City

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

तुझा विसर न व्हावा !

अनंत वाचाळ बरळती बरळ!