सीमोल्लंघन ज्याचे त्याचे..!

☘ *दसऱ्याचा मुहूर्त सिमा ओलांडण्यासाठी उपयुक्त समजला जात असला तरी, राजकारणात सीमा पार करण्यासाठी मुहूर्तपेक्षाही योग्य 'टायमिंगची' गरज असते... यंदाच्या _शिलांगनात_ कोण साधनार टाइमिंग??*🏹

☘🍀🏹🏹🍀☘🏹🏹🍀☘

*'सीमोल्लंघन' ज्याचे त्याचे.!*

🏹🏹☘☘🏹🏹☘☘🏹🏹
*_कोणत्याही मह्त्वाकांक्षी योजनेच्या किंव्हा मोहिमेच्या शुभारंभा साठी सीमोल्लंघन दसऱ्याचा मुहूर्त उत्तम मानला जातो. दसरा हा विजयाचा दिवस ! त्यामुळे त्याला विजयादशमी असेही म्हणतात. या दिवशी सीमोल्लंघन करण्याची प्रथा असल्याने पूर्वी राजे महाराजे याच दिवशी मोहिमांची सुरवात करत असत. परंतु बदलत्या काळानुसार देशात राजेशाही जाऊन लोकशाही आली, आणि लोकशाहीमध्ये सीमोल्लंघन केवळ नवा प्रदेश जिंकण्यासाठी नाहीतर.. नवा विचार जिंकण्यासाठी केले जाण्याची पद्दत रूढ होऊ लागली. फक्त आपट्याच्या पानांचं सोन नाही तर विचारांचं सोन लुटण्याचा प्रघात राजकारणात सुरु झाला. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्ताला एक आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. या दिवशी विविध पक्ष संघटनांचे मेळावे होतात. या मेळाव्यातून नव्या विचारांचे आणि नव्या घोषणांचे सीमोल्लंघन केले जाते. यंदाचा दसराही अनेक राजकीय युद्ध मोहिमांच्या शंखध्वनीने साजरा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत._*

*'शिवसेना'* आणि *दसरा 'मेळावा'* एक अतूट नातं आहे. पूर्वी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आपल्या खास ठाकरे शैलीत सर्वांची पिसं काढणार भाषण शिवतिर्थावर करायचे. त्यांच्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हि परंपरा पुढे नेत आहेत. राजकीय मोहिमांचा श्रीगणेश आणि विविध मुद्द्यावरील पक्षाची भूमिका या मेळाव्यातून मांडण्याची प्रथा असल्याने महाराष्ट्राचे लक्ष याकडे आकृष्ट झालेले असते. *यंदा दसरा मेळाव्या आधी 'होय, शिवसेना निर्णयाच्या जवळ आली आहे.' असा संकेत देत, सेना सत्तेचे 'सीमोल्लंघन' करण्याची भाषा करत असल्याने या मेळाव्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.* अर्थात, तीन वर्षापसून भाजपाच्या अनुल्लेखाचा मार खात असलेली सेना 'दसरा' मुहूर्तावर 'सत्ता' सीमोल्लंघनची घोषणा करण्यासाठी फारशी अनुकूल दिसत नाही. _नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत याबाबत मंथन करण्यात आले होते. मात्र यावर भाजपाची कुठलीच प्रतिक्रिया आली नाही. तसेही सेनेच्या धमक्यांना आता भाजपा लाइटली घेऊ लागली आहे. कारण, सेनेने पाठिंबा काढला तरी सरकार पडण्याची श्यक्यता कमीच आहे. मुख्यमंत्री म्हणतात तसे अनेक 'गुप्त' हात भाजपाचे सरकार वाचविण्यासाठी पुढे येऊ शकतील. शिवसेनेचे आमदारही द्विधा मनस्थितीत असल्याच्या बातम्या येत आहेत. सत्तेतून बाहेर पडा, असा आग्रह काही सेना आमदारांचा आहे तर काही पदाधिकारी आणि मंत्र्याना शिवसेनेने सत्तेत कायम राहावे, असे वाटते. त्यामुळे एखादवेळी सेनानेतृत्वाणे सत्तेचं सीमोल्लंघन करण्याचा निर्णय घेतला तर पक्ष एकसंघ राहील का?_ हा प्रमुख प्रश्न. त्यामुळे *सत्तेत राहूनच सरकारवर वचक ठेवण्याची खेळी सेना खेळणार कि अंतिम निर्णय जाहीर करणार? याची उत्सुकता दसरा मेळव्यापर्यंत कायम राहील,*यात शंका नाही.

*भगवानगडावरील दसरा मेळावा* हा सुद्धा राज्याच्या राजकीय पटलावर आपला ठसा उमटाऊन जातो.. _भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हयात असताना भगवानगडावर त्यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा संपन्न होत आला आहे. त्यांच्या निधनानंतर ना.पंकजा मुंडे यांनी त्यांचा वारसा सांभाळला आहे._ आजपर्यंत भगवानगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात गोपीनाथ मुंडे यांनी आणि मागील दोन वर्षे पंकजा मुंडे यांनीदेखील भाषण केले आहे. मात्र गेल्यावर्षी भगवानगडाचे महंत असलेल्या नामदेवशास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना भगवानगडावरील दसरा मेळाव्यात राजकीय भाषण करण्यास विरोध दर्शविला आणि वादाची ठिणगी पडली. ना. मुंडे आणि महंत समर्थकांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला. मात्र पंकजाताईंनी विरोधाच्या भूमिकेचे सीमोल्लन्घन करून सामन्जश्याची भूमिका घेत गडाच्या पायथ्याशी मेळावा घेतला. _यंदाचा दसरा मेळावा तोंडावर आला असतानाही अजूनपर्यंत यावर तोडगा निघालेला नाही. ना. पंकजा मुंडे यांनी एक भावनिक पत्र गडाच्या महंतांना पाठविले असून, माहेरची दिवाळी भेट म्हणून गडावर दसरा मेळावा घेऊ द्या, अशी विणवणी केली आहे._ *समाज बांधणं जमलं नाही तर किमान तोडणं तरी आपण होऊ देऊ नये. अशी साद घालत गडावर मेळावा घेऊ देण्याची परवानगी मागितली आहे. महंत नामदेवशास्त्री अजूनही या गोष्टीला अनुकूल नसल्याची माहिती मिळत असल्याने पंकजाताईं काय भूमिका मांडणार?* याचीही उत्सुकता शिगेला पोहचली आहे. गेल्या वर्षी लाखो समर्थकांच्या उपस्थतीतीतून ताईचा जनाधार दिसून आला होता. यंदाचा दसरा मेळावा हि विराट होणार, यात शंका नाही, फक्त कुठे ? ते अजूनही गुलदस्त्यात आहे.

नागपूरमधील *राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा* जितका संघ स्वयंसेवकांसाठी महत्वाचा आहे, तितकाच तो राजकीय दृष्ट्याही दखलपात्र ठरतो, किंबहुना, *संघ हा भाजपाची पितृसंस्था असल्याने संघाने व्यक्त केलेल्या भूमिकेला राजकारणात जास्त महत्व असते.* देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता असल्याने सत्ताधाऱ्यांना याच व्यासपीठावरून कधी खोचक *सल्ला* दिला जातो, तर कधी *प्रशस्तीपत्र*. संघाकडून कौतुक होणे या गोष्टीला संघ आणि भाजपात अधिक महत्व दिले जाते. सरसंघचालक या सोहळ्यातून आपली भूमिका विषीद करतात, त्यांची हि भूमिका बहुतांशवेळा सरकारचा अजेंडा बनून जाते. गेल्या वर्षी गोरक्षणाच्या मुद्द्यावर सरसंघचालकांनी भाष्य केले होते, लोकसभा निवडणुका वर्षा दोन वर्षावर आल्या असल्याने यावेळी ते कोणता अजेंडा समोर करतात याची उत्सुकता आहे. तद्वातच *मोदी सरकार आणि फडणवीस सरकाराच्या कामाचे मूल्यमापन ही सरसंघचालक आपल्या भाषाणूत मांडण्याची श्यक्यता आहे.* शिवाय, _दसऱ्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार असल्याने जसे विध्यार्थ्याला निकालाचे टेन्शन असते तसेच 'टेंशन' कदाचित राज्य आणि केंद्रामधील काही मंत्र्याना  आले असल्याची श्यक्यता नाकारता येत नाही._ 

*'दसरा' हा मुहूर्त सिमा ओलांडण्यासाठी उपयुक्त समजला जात असला तरी, राजकारणात सीमा पार करण्यासाठी मुहूर्तपेक्षाही योग्य टायमिंगची गरज असते.* घटस्थापनेच्या मुहूर्तावर काँग्रेसची सीमा ओलांडणाऱ्या राणे यांना या वाक्यातील सत्यता कदाचित अधिक पटेल! _काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपावाशी होऊ पाहणारे नारायण राणे सध्या चांगल्याच चक्रव्युव्हात अडकले आहे. दिल्ली वारी होऊनही पक्षप्रवेशाचे सकारात्मक फळ पदरी न पडल्याने आता राणे नवा पक्ष काढण्याचा सल्ला अमलात आणतील कि त्यांचा एखाद्या पक्षात थेट प्रवेश होईल, यावरून त्यांची टायमिंग चुकली कि बरोबर होती, हे कळेल आणि तेही दसऱ्यालाच..!_
*एकंदरीत,यंदाच्या दसऱ्यालाही अनेक राजकीय युद्ध मोहिमांचा शंख फुकला जाणार आहे, यात 'टायमिंग' कुणाचा साथ देते. यावर त्याचे पुढील राजकीय भवितव्य अवलंबुन राहील, एव्हडे मात्र निश्चित..!!*

-Adv. Haridas Umbarkar
Editor, *Good Evening City*

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

तुझा विसर न व्हावा !

अनंत वाचाळ बरळती बरळ!