*'छोरीया छोरोसे कम है के..?’*


🙍🏻🙍🏻🙍🏻🙍🏻🙍🏻🙍🏻🙍🏻💃

*'छोरीया छोरोसे कम है के..?’*
👇👇
*ज्या क्षेत्रात पुरूषी मानसिकता कायम वलयात राहिली, अशा कुस्तीसारख्या रांगड्या खेळात ऑलम्पिक पदक जिंकणाऱ्या फोगाट भगिनींचा भीमपराक्रम दाखविणारा "दंगल" नावाचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला..लहान वयातच मुलांसोबत कुस्ती खेळत त्यांना अस्मान दाखविणाऱ्या  गीता-बबिता या युथ आयकॉन म्हणून समोर आल्या आहेत. या चित्रपटातील 'म्हारी छोरीया छोरोसे कम है के?’ .. हा अमीर खानचा संवाद आजच्या मुलींच्या बदलत्या परिस्थितीचे नेमके चित्र उभे करतो. आज प्रत्येक क्षेत्रात मुलींनी बाजी मारली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी आणि बारावीच्या निकालात मुलींचा वरचस्मा यंदाही कायम राहिला. नुसत्याच राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षातच नाही तर यूपीएससी एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षामधूनही मुलींनी आपले यश अधोरेखित केले आहे. मुलींमध्ये प्रचंड प्रतिभा आणि कार्यशक्ती असल्याचे वारंवार समोर येत असताना समाजाचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही बदलला नसल्याचे दुर्दैवाने अनेक घटनांमधून सातत्त्याने समोर येत राहते. मुलाला वंशाच्या दिव्याचा दर्जा देऊन स्त्री भ्रूण हत्यांच्या घटना आजही घडतात. समाजात महिलांच्याबाबतीत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत आहे. महानगरांमध्ये तर ही बाब ठळकपणे जाणवते. निमशहरी आणि ग्रामीण भागातही महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वृत्तपत्रातून वाचनास येतात. त्यामुळे मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रतिभेला संधी दिली तर त्या देदीप्यमान यश संपादित करू शकतात हे आता समाजाने मान्य करायला हवे.*

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यावर्षीही उत्तीर्ण विध्यार्थ्यानमध्ये मुलींनीच टक्केवारी अधिक आहे. उल्लेखनीय म्हणजे अवांतर गुणांसह १०० टक्के गुण मिळवणाऱयांमध्येही मुली अव्वल ठरल्या आहेत. जिल्ह्यातीही मुलींची योशागाथा दौदीप्यमान अशी राहिली असून ' हम भी किसीसे कम नाही' हे जिल्ह्यातील जिजाऊंच्या लेकींनी नव्याने अधोरेखित केले आहे. त्यामुळे शिक्षणासाठी मुलींना मिळणारे प्रोत्साहन भविष्यातही कायम राखणे गरजेचे आहे. अलीकडे झालेल्या विविध परीक्षांमध्ये मुलांपेक्षा मुलीच बाजी मारत असल्याचे सातत्याने पाहावयास मिळत आहे. मुलींच्या शिक्षणासंदर्भात करण्यात येत असलेली जनजागृती कदाचित याला कारणीभूत असावी. शिक्षणामुळे महिला आणि मुलींच्या जीवन जगण्याच्या स्तरामध्ये सुधारणा होत असल्याचा सुखद अनुभव यामुळे पाहावयास मिळतो. आजची स्त्रीही पुरुषांच्या तुलनेत कोठेही मागे नाही. _प्रचंड आत्मविश्र्वास, चिकाटी, जिद्द आणि बुद्धिमत्तेच्या जीवावर स्त्रीने विविध क्षेत्रांमध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे, पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या पोलिस, लष्करी दल याबरोबर, रिक्षा, ट्रक चालविणे, पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्याचे काम करणे, बसे कंडक्टर, पत्रकारिता, फायरब्रिगेड ही क्षेत्रे सुद्धा महिलांनी काबीज केली आहेत. कला, शिक्षण, विज्ञान, खेळ, राजकारण, समाजकारण अर्थकारण अशा सर्वच क्षेत्रात स्त्रीने उतुंग झेप घेत आहे. इतकेच नव्हे तर अनेक भारतीय मुलींनी परदेशात जाऊन देशाचे नाव रोशन करत आपल्या कर्तृत्वयाचा झेंडा सातासमुद्रापार  रोवला आहे. मात्र, एकीकडे कर्तृत्वान महिलांच्या कर्तृत्वयाचा आलेख वाढत असताना दुसरीकडे पुरषी अत्याचाराच्या बळी ठरणाऱ्या महिला-मुलींची संख्याही दिवसोंदिवस वाढत असल्याची चिंताजनक बाब प्रकर्षाने समोर येत आहे._

_प्रत्येक समाजातील महिलेचा दर्जा हा त्या समाजाच्या प्रगतीचा टप्पा दर्शवितो. भारतीय संस्कृतीचा विचार करता इतर कोणत्याही संस्कृतीपेक्षा भारतीय संस्कृतीने प्रत्येक युगात स्त्रीला महतवाचे स्थान दिलेले आढळून येईल. पूर्वीपासून आतापर्यंत स्त्रीचे महत्व व स्थान लक्षात घेऊनच सर्वात आधी आपल्या मातेला नमस्कार करण्याची आपली परंपरा आणि संस्कृती आहे. तिचे स्थान उच्च आहे, म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये ‘मातृदेवो भव’ असे म्हटले आहे. पुरातन काळात अनेक रणरागिणींनी आपल्या पराक्रमानी इतिहासाची पाने रंगवली दिसून येतात. आजही स्त्री शक्तीच्या पराक्रमाची घोडदौड सुरूच आहे._ आजच्या काळात स्त्रियांना स्वतंत्र आहे, त्या घराबाहेर पडतात, शिकतात, नोकरी करुन अर्थार्जन करतात, उद्योग व्यवसाय चालवितात, त्यांच्या नावालाही वलय प्राप्त होत आहे. हे चित्र आशावादी असले तरीही या चित्राची दुसरी बाजू मात्र काळीकुट्‍ट आहे, त्यामुळे समाजाची मानसिकता बदलविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. स्त्रीकडे केवळ स्त्री म्हणून पाहण्यापेक्षा तिच्याकडे माणूस म्हणून पाहायला शिकले पाहिजे. त्यांना आई, मुलगी, बहीण, बायको यासारख्या पारंपरिक साच्यातून बा

Comments

Popular posts from this blog

ऐसे कैसे झाले भोंदू?

तुझा विसर न व्हावा !

अनंत वाचाळ बरळती बरळ!