Posts

Showing posts from November, 2019

अब कि बार, 'ठाकरे' सरकार!

Image
अब कि बार, 'ठाकरे' सरकार ! अत्यंत उत्कंठावर्धक आणि थरारक ठरलेल्या महाराष्ट्रातील सत्ता नाट्याची तिसरी घंटा अखेर वाजली आहे. काल मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात एका नव्या पर्वाला सुरवात झाली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून बनलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारचा हा प्रयोग महाराष्ट्र पहिल्यांदा अनुभवणार आहे. साहजिकच तिन्ही पक्षांच्या विचारधारा भिन्न असल्याने त्यांच्यातील वैचारिक मतभेदांची चर्चा प्राधान्याने केल्या जातेय. मात्र, महाविकास आघाडीने कॉमन मिनिमम प्रोग्रॅम जाहीर करुन सरकारच्या कारभाराची दिशा स्पष्ट केली आहे. भारतीय संविधानाची तत्त्वे आणि मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्याची ग्वाही महाविकास आघाडीतर्फे देण्यात आल्याने अनेक मुद्द्यांवर पडदा पडला आहे. त्यामुळे 'ठाकरे सरकार' राज्याला विकासाच्या नव्या मार्गावर घेऊन जाईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अर्थात, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रचंड खडतर आव्हानांचे शिवधनुष्य पेलावे लागणा...

पवारांचा 'पॉवरफुल' गेम !

Image
बुद्धिबळाप्रमाणेच राजकारण हा बुद्धी, कौशल्य आणि चातुर्याचा खेळ आहे. यातही प्रत्येक चाल विचारपूर्वक आणि प्रतिस्पर्धी काय चाल खेळतोय वा खेळू शकेल, याचा अंदाज बांधून खेळावी लागते. केंव्हा पुढे जायचे, कुठे माघार घ्यायची, कुणाला शह केंव्हा द्यायचा याची टायमिंग ज्याला कळते तो या खेळात यशस्वी होतो. चातुर्य थोडे जरी कमी पडले की फटका हमखास बसतो. सध्या  सुरु असलेल्या सत्तानाट्यात याची प्रचिती अनेकदा बघायला मिळाली. राजकारण्यांच्या चाली आणि शह-कटाशहानी मागील महिनाभरापासून अवघ्या राज्यच राजकारण ढवळून निघालं. सत्तेच्या या महानाटकात अनेकांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या तर काहींचं गाढव गेलं आणि ब्रहमचर्यही गेलं अशी अवस्था झाली आहे. एकाद्या थरारपटालाही लाजवेल अशा उत्कंठावर्धक आणि रहस्यमय घडामोडीत राजकारणातील चाणाक्य आणि पंडित समजल्या जाणारे  गर्भगळीत झाले असतांना महाराष्ट्रातील एका नेत्याचं नेतृत्व, कर्तृत्व पुन्हा एकदा झळाळून उठलं असून राज्यातील सत्तेच्या महानाटकाचे ते खरे महानायक ठरले आहेत. ते नेते म्हणजे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार!  शरद पवारांचं नेतृत्व आफाट आहे, यात...

पाणी, शेतात अन् डोळ्यातही

दैव देतं अन कर्म नेतं' ही म्हण शेतकऱ्यांच्या बाबतीती नेमकी उलटी लागू होते. काळ्या आईला घामाचा अभिषेक करून शेतकरी आपल्या 'कर्मा'ने हिरवेगार रान फुलवतो. मात्र, त्याचं 'दैव' त्...