काँग्रेस आतातरी बोध घेणार का? सतराव्या लोकसभेचे निकाल लागलेले आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पुन्हा साफ अपयशी ठरली आहे. २०१४ प्रमाणेच या वेळी ही काँग्रेस नुसती हरली नाही तर तिचे पानिपत झाले. विरोधी पक्षनेता पद मिळविण्यासाठी आवश्यक असलेले ५५ खासदारही काँग्रेसला निवडणून आणता आले नाही. मध्यंतरी झालेल्या लढतीत काँग्रेसने भाजपच्या ताब्यातील तीन राज्य जिंकले होते. त्याठिकाणीही बहुमत कायम राखण्यास काँग्रेसला अपयश आले. तब्ब्ल १९ राज्यांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या पक्षसंघटनेची वाताहत झालेली आहे. काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधींचा आक्रमक प्रचार, प्रियांका गांधींची साथ, राफेल प्रकरणापासून बेरोजगारी, शेतकऱ्यांचा असोंतोष असा अनेक मुद्यांचा दारुगोळा सोबत असतानाही काँग्रेसची जी वाताहत झाली ती चिंतनीय आहे. या पराभवाचं विश्लेषण काँग्रेस नेतृत्वाने अगदी खोलवर जाऊन केलं पाहिजे. आपली कुठे, कशी चूक झाली, त्याचा धडा यातून घेतला पाहिजे. काँग्रेससाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी एककल्ली पद्धतीने चालविलेला मोदी विरोधाती...