चेष्टेचे 'लाभार्थी'
चेष्टेचे 'लाभार्थी'*
✒
🌝
🌝
_*'बोलक्याचीं गांजरें विकतात पण न बोलक्याचीं केळीं सुद्धा विकत नाहींत',*_ *जाहिरातीची महती वर्णन करणारा हा वाकप्रचार आज नुसता वाकप्रचार राहिला नाही, तर एक व्यावहारिक सत्य बनला आहे.* _'जो दिखता है, वही बिकता है,' यानुसार क्षेत्र कुठलेही असो ज्याची जाहिरातबाजी जास्त प्रभावी त्याचीच लोकप्रियता अधिक हा नियम लोकमान्य ठरू लागला आहे. परफॉर्मन्स पेक्षा प्रेझेंटेशन ला जास्त महत्व आल्याने जो तो प्रेझेंटेशन, जाहिराती यांच्याच मागे लागलेला दिसतो. अर्थात, आजच्या काळात प्रेझेंटेशन अनिवार्य असल्याचं सत्य नाकारता येणार नाही, मात्र या सत्याला एक दुसरी बाजूसुद्धा आहे. परफॉर्मन्स पेक्षा प्रेझेंटेशन चा प्रभाव जास्त पडत असला तरी, 'परफॉर्मन्स' शिवाय 'प्रेझेंटेशन' ला अर्थ उरत नाही हे सुद्धा एक शास्वत सत्य आहे._ *आपल्या मालाची तारीफ करुन बोलका मनुष्य गिर्हाइकाच्या गळीं हलका माल देखील उतरूवू शकतो, पण एकवेळाचं..दुसऱ्या वेळी ग्राहक त्याच्या जाहिरातीला भुलेलंचं..याची शास्वती देता येत नाही.* _जाहिरातीला ६५ वि कला म्हणण्याचा प्रघात आहे. हि कला प्रत्येकालाच जमते, आणि जमली तरी प्रत्येकवेळी यशस्वी ठरते असे नाही. *कोणतीही जाहिरात करताना, मग ती सरकारी कामांची असो, राजकीय पक्षांची असो किंवा एखाद्या उत्पादनाची, कंटेंट आणि टायमिंग महत्त्वाचं असतं.* यापैकी एक गोष्टही चुकली तर *'करायला गेले काय, आणि वर झाले पाय' ..!* अशी अवस्था होऊन जाते. सध्या, 'मी लाभार्थी' जाहिरातीवरुन सुरु असलेलं वादंग एक उदाहरण म्हणून घेता येईल. नोटाबंदी व जीएसटीमुळे टीकेचे धनी झालेल्या भाजप सरकारने आपली कामे व योजना जनतेसमोर आणण्यासाठी जाहिरातींचा भडिमार सुरू केला. मात्र, वाद-प्रतिवादामुळे या जाहिरातीच सरकारसाठी डोकेदुखी ठरू लागल्या आहेत. जाहिरातीमधील *'कंटेंट'* वरून निरनिराळे वाद समोर येत असून सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवल्या जात आहे. त्यामुळे यावेळी भाजपाचे *'टायमिंग'* चुकले असल्याची प्रतिक्रिया जनमानसात उमटू लागली आहे._
*भारतीय जनता पक्ष जाहिरातीचं बहुमाध्यमी प्रचारतंत्र वापरण्यात एक्सपर्ट असल्याचं गेल्या निवडणुकीत सिद्ध झालं आहे.* तीन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने *'कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा'* या जाहिरातीत सामान्य लोकांचे चेहरे वापरून जनतेच्या मनाला हात घातला. आघाडीच्या नेत्यांमधील मग्रुरी, भ्रष्टाचाराच्या काहण्या, सत्तेच्या विरोधात असलेली अँटी इंकन्बनसी आणि रोजच्या जगण्यातील समश्याला कंटाळलेल्या जनतेला जनसामान्यांच्या मनातील दुखणं मांडणारी भाजपाची जाहिरात इतकी भावली कि, राज्यात लोकांनी भाजपला सत्तेचा कौल दिला. सरकारची तीन वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने पुन्हा लोकांवर जाहिरातीचा मारा करण्यात येत आहे.. तंत्र तेच, फक्त यावेळी सरकारची स्तुती करण्यासाठी जाहिराती करण्यात येत आहे. *सर्वसामन्यांचे चेहरे जाहिरातीत वापरले कि, त्याला प्रसिद्धी चांगली मिळते. याचा पूर्वानुभव असल्याने ' _होय, मी लाभाथी, हे माझं सरकार'_ या गोडगोजिऱ्या शीर्षकाखाली, ज्या लोकांना सरकारी यॊजनांचा लाभ मिळाला. त्याचे फोटो छापून सरकार आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न करतंय.* मात्र, यावेळी हा डाव त्यांच्यावर उलटू लागला आहे. जाहिरातीत जे लाभार्थी दाखविले त्यांना या सरकारच्या काळात 'लाभ' मिळालाच नसल्याचे समोर येत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मिळालेल्या २ लाख ३० हजार रुपयांच्या मदतीमुळे शेततळे बांधले आणि *शेतकऱ्याचं आयुष्य सुखकर झालं, अशी पुणे येथील भिवरीचे शेतकरी शांताराम तुकाराम कटके यांची ‘मी लाभार्थी’ची जाहिरात प्रसिद्ध झाली.* या शेतकऱ्याला आघाडी सरकारच्या काळात शेततळे मंजूर झाल्याचा आरोप झाल्यानंतर, *सर्वसामान्यांना योजना माहित व्हाव्यात, त्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी कटके यांचा फोटो वापरल्याचा खुलासा राज्य सरकारला करावा लागला.* कळवण तालुक्यातील मोहमुख येथील *फुनाबाई पवार* या आदिवासी महिलेने आपल्या घरी शौचालय बांधून हागणदारीमुक्त गावासाठी पुढाकार घेतला. या महिलेची सरकारने मी लाभार्थी म्हणून जाहिरात केली. मात्र त्यांना मिळालेलं शौचालय काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात दिलं गेल्याचा दावा करण्यात येतोय. मुख्यमंत्री या कामाचं श्रेय लाटत असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय. *जाहिरातीतील 'लाभार्थी' वरून सरकार वेळोवेळी तोंडघशी पडत गेल्याने जनतेत सरकारची प्रतिमा मालिन होऊ लागली आहे..आज कोणतेही सोशल मीडिया तपासा त्यावर मी लाभार्थी ची खिल्ली उडविणाऱ्या शेकडो पोष्ट दिसून येतील.* अर्थात, सरकारने चांगल्या कामाची जाहिरात करणे वाईट..असं म्हणता येणार नाही. मात्र ज्या कामासाठी ही जाहिरात करण्यात आली त्याचा हेतू चांगला असावा, सोबतच परिस्थतीतीची जाणीवही ठेवायला हवी. *आज सरकार मी लाभार्थी म्हणून सर्वसामान्य जनतेचे फोटो छापत आहे. मात्र, खरंच जनता लाभाथी आहे का ?*
महागाई, बेरोजगारी, मंदी, शेतकरी आत्महत्या आदी समश्यानी जनता हैराण झाली आहे. देशातील एक वर्ग सर्व सुखसोयींनी युक्त होऊन प्रगती आणि विकासाच्या गप्पा मारतो तर दुसरा आजही आपल्या प्राथमिक गरजांसाठी संघर्ष करताना दिसतो. *सरकार काम करत नाही, असं नाही. मात्र कोणतीही योजना करताना तिचा लाभ पदरी पडण्यासाठी शेकडो अटी जाहीर केल्या जातात.* या देशातील उद्योगपतींना लाखो करोडो रुपयांचे कर्ज एका क्षणात माफ केले जाते, तर कृषिप्रधान असलेल्या या देशातील शेतकऱ्याला काही हजार कोटीची कर्जमाफी देताना सरकारच्या जीवावर येते, हि वास्तविकता आहे. *मग रोज निरनिराळ्या अडचणींशी झुंज देणारा सर्वसामान्य माणूस लाभार्थी कसा?* आज जनता महागाईने होरपाळून निघत आहे, नोटाबंदी, जीएसटी चा असर अजूनही बाजरावर कायम आहे, जाहिराती करून झाल्या तरी अजून शेतकऱयांना कर्जमाफी भेटली नाही, रोजगार,विकासकामांचा कुठे मागमूस दिसत नाही. सरकार घोषणा करते मात्र त्यावर अमल करत नसल्याने जनतेत रोष निर्माण होऊ लागला आहे. मी लाभार्थी च्या माध्यामातून तो सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतो. *आघाडी सरकारच्या काळातील भ्रष्ट मंत्र्यांना आम्ही जेलमध्ये टाकू, अशी घोषणा मुख्यमंत्र्यानी केली होती. सिंचन घोटाळ्याचे पाळेमुळे खोदण्याचे आश्वासनही दिल होतं.. त्यामुळे, 'तीन वर्ष झाले, तरी मी जेलमध्ये गेलो नाही'.. होय, मी लाभार्थी..!* अशी जाहिरात आता 'त्या' भ्रष्ट राजकारण्यांनी केली तर नवल वाटू नये.. अशा प्रतिक्रिया आता जनमानसात उमटू लागल्या आहेत. याचाच अर्थ जनतेला जास्त काळ गृहीत धरता येत नाही, असा घेता येईल. *ज्या सोशल मीडियामध्ये एकेकाळी भाजपाच्या लोकांची क्रेझ होती, त्याचठिकाणी आज त्यांची खिल्ली उडवल्या जाते*, इथंपर्यंत एखादेवेळी समजूनही घेता येईल. मात्र *'क्या हुवा तेरा वादा' हे गाणं मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमात वाजविले जाते, आणि त्यावर मुख्यमंत्र्याना खजिल व्हावं लागतं, ही बाब निश्चितच राजकारणाला आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला शोभणारी नाही.* त्यामुळे नीतिमत्तेच जाण-भान सर्वानीच ठेवायला हवं.. राज्यकर्त्यांनी सुद्धा दिलेल्या आश्वासनावर कायम राहायला हवं.. *बोलणाऱ्याचा माल विकला जातो..पण 'एकदाच'..हा नियम राजकारणालाही लागू पडतो..याची आठवण राज्यकर्त्यांनी ठेवावी..!!!*
- अँड. हरिदास उंबरकर
संपादक, *गुड इव्हिनींग सिटी*
mo 9763469184

Comments
Post a Comment